Advertisement

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशीयुक्त ब्रेड

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना खराब झालेले खाद्यपदार्थ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशीयुक्त ब्रेड
SHARES

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी लांब पल्ल्यांचा गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. परंतु, हे खाद्यपदार्थ खराब असल्याबाबत प्रवाशांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडं दुर्लक्ष केलं. काही दिवसांपूर्वीचं मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बुरशी असलेल्या ब्रेड नाश्त्यात देण्यात आला. ही घटना ताजी असतानाचं पुन्हा एकदा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना खराब झालेले खाद्यपदार्थ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रवास करताना खाद्यपदार्थांच्या सुमार दर्जाबाबत प्रवाशांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवघ्या आठवड्याभरातच ३ प्रमुख एक्स्प्रेसमध्ये दूषित खाद्यपदार्थांबाबत प्रवाशांनी तक्रार दाखल केली. त्यामुळं इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं (आयआरसीटीसी) नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

शनिवारी १७ जणांच्या गटानं ठाणे स्थानकातून चिपळूणला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस पकडली. यापैकी काहीजणांचं आसन डी-५ या डब्यात असल्यानं त्यांनी त्या डब्यातून प्रवास सुरू केला. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास त्यांनी 'ब्रेड-कटलेट' मागवलं होतं. त्यावेळी त्या ब्रेडला बुरशी लागल्याचं आढळल्यानं त्यांनी संबंधित कर्मचारी पुन्हा डब्यात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आणून दिला.

या कर्मचाऱ्यानं ब्रेड-कटलेट बदलून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, बुरशीयुक्त ब्रेड पाहिल्यामुळ पुन्हा ब्रेड खाण्याची इच्छा झाली नाही,' असे जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांचं म्हणणं आहे. ब्रेड-कटलेट मागवण्याआधी पोहे आणि उपमा मागवला होता. मात्र, त्याचा दर्जा चांगला नसल्यानं ब्रेड कटलेट मागवले.

या प्रकरणी सोमवारी सकाळी आयआरसीटीसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी फोन करून घडलेली हकीकत जाणून घेतली. दोषी कंत्राटदार आणि सेवा पुरवणाऱ्यावर गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्याचप्रमाणं, मुदत संपलेले ब्रेड वापरल्यामुळे बुरशी लागल्याची शक्यता आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला एक लाखांचा दंड बजावण्यात आला असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा -

कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या

बेस्ट कर्मचाऱ्यांचा २७ जानेवारीला मोर्चा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा