Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचा २७ जानेवारीला मोर्चा

प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीतर्फे लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा २७ जानेवारीला मोर्चा
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीतर्फे लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार २७ जानेवारी रोजी कृती समितीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा सोमवारी दुपारी ३ वाजता कोतवाल उद्यान येथून सुरू होणार असून, वडाळा आगारापर्यंत चालणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनेकदा आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मात्र, या मागण्या मान्य होत नसल्यामुळं त्यांनी आंदोलनं, मोर्चे काढले. परंतु, तरीही मागण्या होत नसल्यामुळं राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी लॉंग मार्चचं आयोजन केलं आहे. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याच्या निषेधार्थ लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पाचं विलीनीकरण, कामगारांच्या सेवाशर्थी काढू नये, ठरल्याप्रमाणे बसगाड्या विकत घ्या, रिक्त जागा भरा, विनाकंडक्टर बससेवा बंद करा, मालमत्ता विकासक, कंत्राटदारांच्या घशात घालू नका, आदी मागण्यांसाठी लाँग मार्च निघणार आहे.

राज्य सरकारने बेस्ट कामगारांच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं त्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच, या मोर्चाला कामगारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन समितीतर्फे शशांक राव यांनी केले आहे. यापूर्वीही कृती समितीकडून कामगारांच्या प्रश्नावर मोर्चा, आंदोलने करण्यात आली आहेत.



हेही वाचा -

'मुंबई सागा'तील जॉन अब्राहमचा पहिला लुक रिलीज

विद्यार्थ्यांचा राजकीय कार्यक्रमात वापर नको, राज्यातील सर्व शाळांना नोटीसा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा