Advertisement

'मुंबई सागा'तील जॉन अब्राहमचा पहिला लुक रिलीज

अभिनेता जॉन अब्राहमचा लुक या नव्या पोस्टरमधून रिलीज करण्यात आला आहे.

'मुंबई सागा'तील जॉन अब्राहमचा पहिला लुक रिलीज
SHARES

संजय गुप्ता दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता, १९८०-९०च्या दशकात मुंबईत झालेल्या गँगवॉरची कहाणी ‘मुंबई सागा’मधून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा लुक या नव्या पोस्टरमधून रिलीज करण्यात आला आहे.

जॉन एका वेगळ्याच अंदाजात या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. कपाळावर टिळा, त्याची रोखलेली नजर त्याच्या भूमिकेबाबत अधिक उत्सुकता निर्माण करत आहे. जॉनच्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहे.

जॉन अब्राहम, इमरान हाशमीशिवाय ‘मुंबई सागा’मध्ये इतरही अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्रित पाहायला मिळणार आहेत.

१९ जून २०२० रोजी ‘मुंबई सागा’ रिलीज होणार आहे. संजय गुप्ता यांनी यापूर्वी देखील गँगस्टरच्या आयुष्यावर आधारीत अनेक चित्रपट बनवले आहेत.‘कांटे’, ‘शूटआऊट ऍट वडाळा’, ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.



हेही वाचा

वरुण धवन बनला 'Mr. लेले', या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

७ वर्षांनंतर ऋषी आणि नितू कपूर 'या' चित्रपटातून करणार कमबॅक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा