Advertisement

विद्यार्थ्यांचा राजकीय कार्यक्रमात वापर नको, राज्यातील सर्व शाळांना नोटीसा


विद्यार्थ्यांचा राजकीय कार्यक्रमात वापर नको, राज्यातील सर्व शाळांना नोटीसा
SHARES

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा कुठल्याही राजकीय कारणांसाठी वापर करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या नोटीसा राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे सुधारीत नागरिकत्व कायद्या (CAA)च्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या भाजपच्या मोहीमेला धक्का बसणार आहे. 

काही भाजप नेत्यांनी माटुंगा येथील श्री दयानंद शाळेत जाऊन ‘सीएए’ कायद्याचा विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हणत विरोध करा, असं आवाहन केलं होतं. त्यानुसार या शाळेतील ९ ते १७ वयोगटातील  १ हजार विद्यार्थी आणि ४० आंदोलन करणार होते. मात्र ही बाब कळताच मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी, शैक्षणिक संस्थेत राजकीय कार्यक्रम कशासाठी आयोजित करण्यात येत आहे? यावर शाळेकडून खुलासा मागितल्यावर हे आंदोलन पुढं ढकलण्यात आलं.  

हेही वाचा- 

टॅक्सीवर लागणार तीनरंगी दिवे, १ फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी

त्यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या या प्रयत्नांवर सडकून टीका केली, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच उपसंचालकांनी अहवाल सादर केल्यावर अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची संमती न घेता एखाद्या राजकीय कार्यक्रमात सामील केल्याबद्दल आम्ही शाळेविरूद्ध देखील कारवाई करू.” असं म्हणत कारवाईचा इशारा दिला.


त्यानुसार या शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितलं असून राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून नोटीसा पाठवून विद्यार्थ्यांचा कोणत्याही राजकीय कामासाठी वापर होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे.

या निर्णयानंतर ‘सीएए’वरून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. ‘सीएए’ कायद्याचा विरोध होत असतानाही १० जानेवारीपासून हा कायदा लागू करण्यात आला आहे. 

हेही वाचा-

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना ‘असा’ मिळतोय पोषक आहार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा