Advertisement

गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा

या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल सध्या दिल्लीत आहेत, ते कधीतरी मुंबईत येतील, अशा शब्दांत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना इशारा दिला आहे.

गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा
SHARES

आज के शिवाजी नरेंद्र मोदी… या पुस्तकावरून तयार झालेल्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल सध्या दिल्लीत आहेत, ते कधीतरी मुंबईत येतील, अशा शब्दांत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना इशारा दिला आहे. 

हेही वाचा- मोदींचीशिवाजी महाराजांशी तुलना,भाजपची भूमिका काय? 

या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करण्यात आली आहे. यावरून भाजपवर विरोधकांकडून चौफेर हल्ला चढवण्यात येत आहे. यावर मनसेची भूमिका काय? असा प्रश्न विचारला असता, बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, जय भगवान यांनी असं पुस्तक लिहून मूर्खपणा केला आहे. त्यांना पक्षाच्या प्रमुखांनी समज देण्याची गरज आहे. सध्या ते दिल्लीत आहेत, पण कधीतरी मुंबईत येतीलच. 

हेही वाचा- म्हणून केली मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, लेखकाचा खुलासा 

छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाबरोबरही तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांत कुठलीही चूक नाही. त्यांना माहीत देखील नसणार की त्यांच्यावर असं पुस्तक कुणी लिहिलं असेल म्हणून, अशा शब्दांत नांदगावकर यांनी पंतप्रधानांबद्दल सहानुभूतही दाखवली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा