Advertisement

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय?- राऊत

आज के शिवाजी नरेंद्र मोदी… या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आल्यानंतर भाजपवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय?- राऊत
SHARES

आज के शिवाजी नरेंद्र मोदी… या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आल्यानंतर भाजपवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही तुलना भाजपात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना मान्य आहे का?, असा सवाल केला आहे. सोबतच संध्याकाळपर्यंत भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा इशाराही दिला आहे.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचं शक्तीप्रदर्शन 

नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यात आल्याने हे सर्व राजे यांना मान्य आहे का?, शिवरायांच्या वंशजांनो बोला...काही तरी बोला...असा प्रश्नही संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना उद्देशून केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना कधी १३ वा अवतार ठरवले गेले, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केली गेली, ही केवळ चमचेगिरी आहे. भारतीय जनता पक्षाने हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे. तसंच संध्याकाळपर्यंत ही तुलना महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का ? हे स्पष्ट करावं, राज्यातील जनतेलाही ते जाणून घ्यायचं आहे, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा- वडेट्टीवारांची नाराजी दूर 'हे' खातं मिळालं

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा