Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन

दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन
SHARES

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजीच्या जयंती निमित्ताने ऐकीकडे मनसेने महाअधिवेश घेतले असताना. शिवसेनेकडून ही जयंती निमित्ताने वांद्रे येथे 'वचनपूर्ती जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या २३ जानेवारी रोजी जयंती निमित्ती शिवसेनेकडून 'वचनपूर्ती जल्लोष मेळावा' साजरा केला जाणार आहे. वांद्रेच्या बीकेसी मैदानात हा कार्यक्रम होणार असून या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात होणाऱ्या सत्कार सभेला ५० हजारांहून अधीक शिवसैनिक तसेच देशातील नामवंत राजकीय नेते, उद्योजक, कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.

हेही वाचाः-वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर

तर राज्यात विधानसभा निवडणूकीत मनसेला अवघ्या एका जागेवर यश मिळाले आहे. तर विविध जिल्ह्यात ही मनसेची पिछेहाट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे. अशाच युवकांचा मोठा पाठिंबा असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये पून्हा नवा उत्साह आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने  गोरेगाव येथे महाअधिवेशन बोलावले आहे. या महाअधिवेशनाची मनसैनिकांना उत्सुकता लागलेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं या अधिवेशनाद्वारे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिकृतरित्या पदार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे मनसेच्या कार्यकरत्यांच्या उत्सुकतेत आणखीनच भर पडली आहे. मनसेच्या गोरेगावातील नेस्को येथे पार पडणाऱ्या महाअधिवेशनात १८ हजार मनसेचे राज्यभरातील शाखाप्रमुख सकाळपासून हजेरी लावणार आहे. तर संध्याकाळी राज ठाकरे आगामी पक्षाची भूमिका आपल्या भाषणातून जाहीर करतील, अशी चर्चा आहे. यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाकडे सर्वांचे लक्षे लागून आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा