Advertisement

म्हणून केली मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, लेखकाचा खुलासा

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर विरोधकांकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलं. समाजातील सर्व स्तरातून या पुस्तकाला विरोध होऊ लागला.

म्हणून केली मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, लेखकाचा खुलासा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं पुस्तक लिहिणारे लेखक जयभगवान गोयल यांनी या पुस्तकावरून गदारोळ उडाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. पक्षाने आदेश दिला, तर हे पुस्तक आपण मागे घेऊ, असं गोयल म्हणाले आहे.

भाजपाच्या दिल्लीत आयोजित धार्मिक, सांस्कृतिक संमेलनात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे गोयल यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशीत करण्यात आलं होतं. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर विरोधकांकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलं. समाजातील सर्व स्तरातून या पुस्तकाला विरोध होऊ लागला. 

हेही वाचा-जिभेला लगाम घाला, संभाजीराजेा राऊतांवर भडकले

त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक आपण मागे घेऊ असं गोयल यांनी सांगिगलं. तसंच मोदी यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्यामागचं कारणही गोयल यांनी स्पष्ट केलं. 

गोयल म्हणाले, अनेकजण राम आणि कृष्ण या देवांसोबत काहींची तुलना करतात. मी देखील त्याचप्रकारे मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. भारतात दहशतवाद्यांकडून संसदेवर, मुंबईत हल्ले झाले. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. उलट मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून चोख प्रत्युत्तर दिलं.   

हेही वाचा- मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय? राऊत  

मोदी सरकारच्या काळात देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सक्षम वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसं काम करत होते, तसंच काम नरेंद्र मोदी करत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे, त्यामुळेच त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केल्याचं गोयल म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा