Advertisement

जिभेला लगाम घाला, संभाजीराजे राऊतांवर भडकले

नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आलेली तुलना शिवरायांच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून विचारला होता.

जिभेला लगाम घाला, संभाजीराजे राऊतांवर भडकले
SHARES

आज के शिवाजी नरेंद्र मोदी… या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आलेली तुलना शिवरायांच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून विचारला होता. त्याला छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी तितक्याच कडक शब्दांत उत्तर दिलं आहे.  

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेलं आज के शिवाजी नरेंद्र मोदी…हे पुस्तक भाजपाच्या धार्मिक, सांस्कृतिक संमेलनात प्रकाशीत करण्यात आलं. त्यावरून भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. त्यावर ट्विटरवरून निशाणा साधताना राऊत म्हणाले, आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!  

हेही वाचा- मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय?

  आल्याने हे सर्व राजे यांना मान्य आहे का?, शिवरायांच्या वंशजांनो बोला...काही तरी बोला...असा प्रश्नही संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना उद्देशून केला. 

त्यावर, गरळ ओकून राजकारण करणं बंद करा, संजय राऊतांनी जिभेवर लगाम घालावा, मुजोरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी उत्तर दिलं आहे. तर, . पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवर घाला, अशी विनंती शिवेंद्रराजे यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. 

हेही वाचा- शिवसेनेचे ३५ नाराज आमदार भाजपकडे येणार, नारायण राणे यांचा दावा


सोबतच  'शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे अनुभवी नेते आहेत. शिवाय ते पत्रकार देखील आहेत. त्यामुळे त्यांनी भाषा जपून वापरावी. टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण योग्य भाषेतून आरोप-प्रत्यारोप केले जावेत. खासदार आहेत म्हणून काहीही बोलण्याचा अधिकार त्यांना नाही', असं शिवेंद्रराजे म्हणाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा