Advertisement

संजय राऊत यांना पदावरून काढा- संभाजी भिडे

शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना पदावरून हाकला,' अशी मागणी संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

संजय राऊत यांना पदावरून काढा- संभाजी भिडे
SHARES

छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. त्यांच्या वंशजांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना पदावरून हाकला,' अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' (Aaj ke shivaji narendra modi) पुस्तकाच्या माध्यमातून भाजप नेते जयभगवान गोयल (jai bhagwan goyal) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना केली आहे. याबद्दल शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचं (shiv sena) नाव ठेवताना शिवरायांच्या वंशजांना विचारलं होतं का? असा प्रश्न उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावे, असं आव्हान दिलं. त्यांच्या वक्तव्यामुळं या वादात तेल ओतलं गेलं. 

हेही वाचा- राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- नारायण राणे 

राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यापाठोपाठ शुक्रवारी सांगलीत बंद पुकारण्यात आला. भिडे यांच्या 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेनं या बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

संभाजी भिडे म्हणाले, बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. राऊत असो किंवा गोयल शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल, असं वागलेलं चालणार नाही. नरेंद्र मोदींची (narendra modi) शिवरायांशी तुलना चुकीचीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही.   

आमचा बंद कुठल्याही पक्षाच्या वा शिवसेनेच्या विरोधात नाही. उलट शिवसेनेचा विस्तार व्हावा या मताचा मी आहे. परंतु समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी घ्यायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राऊत यांना तात्काळ पदावरून काढावं, अशी मागणी भिडे यांनी केली.

हेही वाचा- तर, राऊत कुठंतरी कारकुनी करत असते, मनसेच्या ‘या’ नेत्याने लगावला टोला 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा