Advertisement

राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- नारायण राणे

संजय राऊत यांच्या भावाला मंत्रिपद न मिळाल्याने राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.

राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- नारायण राणे
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. आमच्या दैवताबद्दल कुणीही चुकीचं बोलत असेल, तर त्याची जीभ जागेवर ठेवणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांच्या भावाला मंत्रिपद न मिळाल्याने राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.

हेही वाचा- तर, राऊत कुठंतरी कारकुनी करत असते, मनसेच्या ‘या’ नेत्याने लगावला टोला

भाजप नेते उदयनराजे यांना उद्देशून शिवरायांचे वंशज असाल तर पुरावे द्या, असं आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राणे म्हणाले की, शिवरायांच्या वंशजांकडून पुरावे मागणाऱ्या राऊत यांना तुमचे वडिल कोण याचा पुरावा द्या असं म्हटलं, तर देता येईल का? त्यामुळे तारतम्य सोडून बोलू नका. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, त्यांना आणि त्यांच्या वंशजांना यापुढं काही बोलाल तर यापुढे भाजप ते सहन करणार नाही.

संजय राऊत इंदिरा गांधींबद्दल जे बोलले, ते काँग्रेसच्या नेत्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. कारण सत्तेसाठी लाचार झालेल्या नेत्यांना आपल्या नेत्यांबद्दलही आदर उरलेला नाही. महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून राऊत यांना काहीही काम उरलेलं नाही. या सरकारमध्ये त्यांच्या भावाला मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असंही राणे म्हणाले.     

हेही वाचा- भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, थोरातांचा राऊतांना टोला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement