भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, थोरातांचा राऊतांना टोला

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी मुंबईतील माफीया डाॅन करीम लाला यांना भेटायच्या, असं वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

SHARE

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी मुंबईतील माफीया डाॅन करीम लाला यांना भेटायच्या, असं वक्तव्य करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राऊतांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं असलं, तरी भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राऊतांना दिला आहे.

राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेस नेते संजय निरूपम, मिलिंद देवरा आणि चरणसिंह सप्रा यांनी नाराजी व्यक्त करत हे वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किंवा मुंबई अध्यक्षांकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत देण्यात आली नव्हती.

हेही वाचा- मी दाऊदला दम दिलाय- संजय राऊत

परंतु माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांचं वक्तव्य चुकीचं होतं. त्यावर आमची नाराजी होती. ही नाराजी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतलं असलं, तरी भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत थोरात यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

दरम्यान, करीम लाला हा त्यावेळी पठाणांचा नेता असल्याने पठाणी समुदायांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेते त्यांना भेटत असत. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असून इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला आजही आदर आहे. माझ्या वक्तव्याने कुणी दुखावलं असेल, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, या शब्दांत राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. 

 हेही वाचा- रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शरद पवार यांच्या वक्तव्याने वादात भर?

संबंधित विषय
ताज्या बातम्या