Advertisement

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शरद पवार यांच्या वक्तव्याने वादात भर?

मला ‘जाणता राजा’ म्हणा, असं मी अजूनपर्यंत कुठंही सांगितलेलं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शरद पवार यांच्या वक्तव्याने वादात भर?
SHARES

मला ‘जाणता राजा’ म्हणा, असं मी अजूनपर्यंत कुठंही सांगितलेलं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरु झालेल्या वादावर पवार यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केलेली चालत नाही, मग शरद पवारांना 'जाणता राजा' का म्हणतात? असा सवाल भाजपने उपस्थित केला होता. 

हेही वाचा- शिवरायांचे वंशज असाल, तर पुरावे आणा, उदयनराजेंना राऊतांचं प्रत्युत्तर

त्यावर एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, मी कधीही, कुठेही मला जाणता राजा म्हणा, असं म्हटलेलं नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रामाणिपणे अभ्यास केला असेल, त्यांना ठाऊक असेल की शिवाजी महाराजांची उपाधी जाणता राजा नाही, तर छत्रपती हिच होती. ‘जाणता राजा’ हा शब्द रामदास स्वामींनी आणला आहे आणि जे लोक सांगतात की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते, तर ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे गुरू ह्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांवर त्यांचेच संस्कार झाले आहेत.

दरम्यान आज के शिवाजी - नरेंद्र मोदी... हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं असलं, तरी त्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. 

हेही वाचा- मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा