Advertisement

शिवरायांचे वंशज असाल, तर पुरावे आणा, उदयनराजेंना राऊतांचं प्रत्युत्तर


शिवरायांचे वंशज असाल, तर पुरावे आणा, उदयनराजेंना राऊतांचं प्रत्युत्तर
SHARES

आम्ही सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा आदर करतो. उदयनराजे जर शिवरायांचे वंशज असतील, तर त्यांनी तसे पुरावे आणावेत, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे यांना टोला हाणला.

शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ वापर करण्यात आला. शिवसेना स्थापन करताना शिवरायांच्या वंशजांची परवानगी मागितली होती का? शिवसेनेच्या नावातून शिव नाव काढून ठाकरे सेना करून दाखवा किती तरूण तुमच्या मागे उभे राहतील? वडा पावला शिवरायांचं नाव दिलं हाच तुमचा आदर? महाशिव आघाडीतून शिव नाव का काढून टाकलं? असे प्रश्न उपस्थित करत उदयनराजेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केले हाेते. 

हेही वाचा- मी दाऊदला दम दिलाय- संजय राऊत

त्यावर एका जाहीर मुलाखातीत उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, उदयनराजे हे भाजपचे माजी खासदार आहेत. त्यामुळे हे विरोधी पक्षाची भूमिका मांडताहेत. ते काय बोलताहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही सातारा आणि कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिथं येतं तिथं आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या एकजुटीचं काम पुढे नेलं. गणपती आणि विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही. तेव्हा शिवाजी महाराजांचे वंशज असण्याचे पुरावे उदयनराजेंनी आणावेत.

शरद पवार यांना देण्यात आलेल्या ‘जाणता राजा’ या उपाधीबद्दल बोलताना, सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे शरद पवार जाणते राजे आहेतच. कारण जनतेने त्यांना ही उपाधी दिलेली आहे. हिंदुहृदयसम्राट ही उपाधी देखील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी स्वत:हून घेतलेली नाही. तर लोकांनी दिली आहे. शिवाजी महाराजांना गोरगरीब हा आमचा राजा आहे असं म्हणायचे, म्हणून ते रयतेचे राजे होते, असं राऊत यांनी सांगितलं.  

हेही वाचा- जुनी मढी उकरू नका, वादग्रस्त पुस्तकावरून शिवसेनेचं नमतं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा