Advertisement

शब्द मागे घ्या, काँग्रेस नेते राऊतांवर भडकले

राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले असून राऊतांनी आपले शब्द मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

शब्द मागे घ्या, काँग्रेस नेते राऊतांवर भडकले
SHARES

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी मुंबईचा माफीया डाॅन करीम लाला याला भेटण्यासाठी यायच्या, असं वक्तव्य करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले असून राऊतांनी आपले शब्द मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

पुण्यात झालेल्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत यांनी हे वक्तव्य केलं होतं. मुंबईतील गुन्हेगारी विश्व आणि त्याचा राजकारणावर प्रभाव या विषयावर बोलत असताना त्यांनी करीम लाला यांना भेटण्यासाठी इंदिरा गांधीही येत असत असं वक्तव्य केलं होतं. राऊत यांच्या वक्तव्यावर अद्याप महाराष्ट्र काँग्रेस किंवा मुंबई काँग्रेसने अधिकृत भूमिका घेतलेली नाही. परंतु काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र या वक्तव्यावर हरकत नोंदवली आहे.

हेही वाचा- मी दाऊदला दम दिलाय- संजय राऊत

इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत कधीही तडजोड केली नाही. खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेलं चुकीचं वक्तव्य मागे घ्यावं असं मी माजी मुंबई काँग्रस अध्यक्ष या नात्याने त्यांना आवाहन करतो, असं ट्विट काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केलं आहे. 

तर, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी देखील संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मिस्टर शायर यांनी दुसऱ्यांच्या हलक्या-फुलक्या कविता ऐकवून महाराष्ट्राचे मनोरंजन करत राहावं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात राऊत अपप्रचार करत असतील तर त्यांच्यावर नक्कीच पश्चातापाची वेळ येईल. इंदिरा गांधी यांच्याबाबत काल त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी मागे घ्यावं, अशा शब्दांत निरूपम यांनी राऊतांना टोमणा हाणला आहे.

हेही वाचा- शिवरायांचे वंशज असाल, तर पुरावे आणा, उदयनराजेंना राऊतांचं प्रत्युत्तर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement