Advertisement

महापालिका उभारणार महालक्ष्मी रेल्वे मार्गावर २ पूल

महालक्ष्मी (Mahalakshmi) येथील डॉ. ई. मोझेस मार्ग (Dr. e Moses Marg) आणि केशवराव खाड्ये मार्ग (Keshavrav Khadye Marg) इथं रेल्वे मार्गावरून जाणारे २ उड्डाणपूल (bridge) बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं (BMC) घेतला आहे.

महापालिका उभारणार महालक्ष्मी रेल्वे मार्गावर २ पूल
SHARES

दक्षिण मुंबईमधून (South Mumbai) पश्चिम उपनगर हा प्रवास जलद गतीनं व्हावा तसंच, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा या उद्देशानं नरिमन पॉइंट (Nariman Point) ते कांदिवलीदरम्यान (Kandiwali) मुंबई सागरी किनारा मार्ग (Coastal Road) उभारण्यात येत आहे. यावेळी वाहतुकीचे नियमन (Traffic rule) सुरळीत व्हावे यासाठी मुंबईतील महालक्ष्मी (Mahalaxmi) येथील डॉ. ई. मोझेस मार्ग (Dr. e Moses Marg) आणि केशवराव खाड्ये मार्ग (Keshavrav Khadye Marg) इथं रेल्वे मार्गावरून जाणारे २ उड्डाणपूल (bridge) बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं (BMC) घेतला आहे. या पुलांच्या बांधकामासाठी ७४५.६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मरिन ड्राइव्ह (Marin Drive) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या (Bandra-Worli Sea-link) सागरी किनारा मार्ग उभारणीचं काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महालक्ष्मी (Mahalaxmi) आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपल्या वाहनानं सागरी किनारा मार्गावर जाणं सोयीचं ठरणार आहे. या पुलांच्या उभारणीसाठी स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रा. लिमिटेडची तांत्रिक सल्लागार म्हणून, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईची (आयआयटी) फेरतपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट कंपनीनं या पुलांसाठी संकल्पचित्रं, सर्वसाधारण आराखडे तयार केले असून, त्यास रेल्वे प्राधिकरणानंही मंजुरी दिल्याची माहिती मिळते.

या पुलांच्या उभारणीसाठी अंदाजे ५०७ कोटी ९६ लाख ६६ हजार ६१२ रुपये खर्च येणार असल्याची महापालिकेची अपेक्षा आहे. हा अंदाजित खर्च नमूद करून पुलांच्या उभारणीसाठी महापालिकेनं निविदा जारी केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत ४.२५ टक्के अधिक दरानं निविदा सादर करणाऱ्या अ‍ॅप्को- सीआरएफजी या संयुक्त कंपनीला ७४५ कोटी ६९ लाख ५३ हजार ३२७ रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

अ‍ॅप्कोची भागीदार कंपनी असलेली सीआरएफजी कंपनी चीनमधील असून, या दोन्ही कंपन्यांची महापालिकेकडं नोंदणी नाही. त्यामुळं स्थायी समितीनं प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर कार्यादेश हाती पडल्यावर ३ महिन्यांमध्ये या कंपन्यांना महापालिकेमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. तसंच, पावसाळा वगळता ३६ महिन्यांमध्ये या पुलांची उभारणी करावी लागणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील (Mahalaxmi Railway Station) पूल हा ९० ते १०० वर्षे जुना आहे. तसंच, या पूलाचं आयुर्मान पूर्ण झालं आहे. या पुलावर कायम वाहतूक कोंडी होत असते. सुधारित विकास नियोजन आराखडा २०३४ मधील तरतुदीनुसार सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महालक्ष्मी इथं पूल बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार या २ पुलांचं बांधकाम करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

'या' ४ लोकल सेवेतून बाद

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा