Advertisement

पाॅलिटिकल किडेगिरी, शिवरायांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा

तान्हाजी (Tanhaji) या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग (morphing) करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे.

पाॅलिटिकल किडेगिरी, शिवरायांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा
SHARES

पाॅलिटिकल कीडा (political kida) नावाच्या ट्विटर हँडलवरून (twitter handle) तान्हाजी (Tanhaji) या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग (morphing) करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

तीव्र नाराजी

हा व्हिडिओ बघितल्यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ ट्विटर हँडलवरून तात्काळ काढून टाका, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही काहीजण देत आहेत. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची ( delhi vidhan sabha election 2020) धामधुम सुरू झाली असून भाजप आणि आम आदमी पार्टी या निवडणुकीत प्रामुख्याने एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. भलेही हा व्हिडिओ भाजपच्या (bjp) अधिकृत ट्विटर हँडलवरून टाकण्यात आलेला नसला, तरी या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (arvind kejriwa) यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा- ‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत शिवरायांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा चेहरा लावण्यात आला असून तानाजी मालुसरे (tanaji malusare) यांच्या चेहऱ्यावर अमित शहा (amit shah) यांचा चेहरा माॅर्फ करून टाकण्यात आला आहे. तर अरविंद केजरीवाल उदयभान राठोड दाखवण्यात आले आहेत. मोदी आणि शहा दिल्लीचं युद्ध जिंकण्यासाठी निघाल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. तर केजरीवाल त्यांची वाट अडवताना दाखवले आहेत. अखेर दोघांची सरशी झाल्यानंतर दिल्ली इलेक्शन २०२० असं व्हिडिओच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरील तान्हाजी नावाच्या जागी ‘शहा’जी असंही लिहिण्यात आलं आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवला आहे. शिवसेनेच्या (shiv sena) विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया देतात, ते मला बघायचं आहे. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही अजून कुणाकडूनही एका ओळीचीसुद्धा प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा प्रश्नही राऊत यांनी याबाबत केला आहे.

हेही वाचा- मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा