Advertisement

अळूचं फदफदं की मिरचीचा ठेचा, संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोमणा


अळूचं फदफदं की मिरचीचा ठेचा, संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोमणा
SHARES

येत्या २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (mns) पहिलंवहिलं महाअधिवेशन गोरेगाव इथं होऊ घातलं आहे. हे अधिवेशन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या जयंतीदिनी होत असल्याने मनसे आणि शिवसेनेकडून या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मितीला सुरूवात झाली असून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी शिवसेनेला ट्विटरवरून टोमणा मारला आहे.

काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेससोबत (ncp) मिळून महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi) सरकार स्थापन करताना शिवसेनेला कडव्या हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्द्याची तलवार म्यान करावी लागली आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेला वरचढ भूमिका घेता येऊ शकेल. त्यासाठीच मनसे आपल्या झेंड्यात बदल करून हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारणार असं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- कोणता झेंडा  घेणार हाती? राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) या महाअधिवेशनात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिवसेनेकडून (shiv sena) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या जंगी सत्काराचंही आयोजन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

या ट्विटमध्ये (tweet) 'मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा.... ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।' असं म्हणत शिवसेनेला अळूचं फदफदं आणि शिवसेनेला मिरचीच्या ठेच्याची उपमा दिली आहे.  

दरम्यान या मेळाव्यात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील लाॅन्च करण्यात येऊ शकतं, असं म्हटलं जात आहे. अमित ठाकरे यांनी आरेच्या मुद्द्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली होती. त्यानंतर नवी मुंबई इथं झालेल्या मोर्चाचं नेतृत्व देखील त्यांनी केलं होतं. राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना बहुतेकवेळा स्टेजच्या खाली दिसणारे अमित ठाकरे राजकारणातील अधिकृत पदार्पणानंतर मनसेचे नेते म्हणून पुढं येऊ शकतात. तसं झाल्यास पक्षाला तरूण चेहरा मिळण्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासही मदत होणार आहे.

त्यामुळे राज ठाकरे या अधिवेशनात कोणती भूमिका घेतात याचसोबत अमित ठाकरे यांचं पदार्पण होतं की नाही, याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा