एचडीआयएलवर आणखी एक गुन्हा दाखल 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

करारानुसार 2013 च्या अखेरपर्यंत फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले होते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी एकूण 81 लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिले

एचडीआयएलवर आणखी एक गुन्हा दाखल  200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
SHARES
भांडुप (bhandup) येथील प्रकल्पात 400 ग्राहकांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे (HDIL) प्रवर्तक राकेश व सारंग वाधवान यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखे(EOW) ने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: -PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान

 भांडुप येथील मॅजेस्टिक टॉवरशी संबंधित हे प्रकरण असून, आर्थिक गुन्हे शाखेचा गृहनिर्माण कक्ष पुढील तपास करत आहे. भांडुप येथील मॅजेस्टिक टॉवरमधील सदनिका मालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष चंद्रकिशोर कोलिंदीवाला (69) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 2010 मध्ये वृत्तपत्रांतील जाहिरातीवरून या प्रकल्पाची माहिती मिळाली. त्यानुसार टूर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या कोलिंदीवाला यांनी एचडीआयएल च्या कार्यालयात जाऊन प्रकल्पाची माहिती घेतली. 

हेही वाचा: -PMC घोटाळा : एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

 या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरील थ्री-बीएचके सदनिका 86 लाख 36 हजार रुपयांना खरेदी केली. त्यानंतर 17 ऑक्‍टोबर 2013 रोजी त्या फ्लॅटबाबत "सेल डीड' तयार करण्यात आले. त्या करारानुसार 2013 च्या अखेरपर्यंत फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले होते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी एकूण 81 लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिले; परंतु 2013 उलटल्यानंतरही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता मजुरांची अनुपलब्धता, मालाची कमतरता अशी कारणे देण्यात आली. त्यानंतर कोलिंदीवाला यांनी घरे खरेदी करणाऱ्या अन्य व्यक्तींची माहिती घेतली. 

हेही वाचा:-कुर्लात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक


या सर्वांनी मे 2019 मध्ये महारेराकडे तक्रार केली. पुढे एचडीआयएलने बुडित प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगून प्रकरण बंद केले. त्यानंतर तक्रारदारांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा