Advertisement

PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकर परत मिळावे यासाठी कंपनीच्या मालकीची मालमत्ता लवकरात लवकर विकण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सरोश दमानिया यांनी केली आहे.

PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान
SHARES

तब्बल ६७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेला (पीएमसी) मोठा फटका बसला आहे. बँकेचा बुडालेला हा पैसे वसूल करण्यासाठी हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) मालमत्ता आर्थिक गुन्हे विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय विकणार आहे. ही मालमत्ता विकण्यास हरकत नसल्याचे अटकेत असलेला कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान याने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितलं. 

पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने एचडीआयएल कंपनीच्या मालकीची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकर परत मिळावे यासाठी कंपनीच्या मालकीची मालमत्ता लवकरात लवकर विकण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सरोश दमानिया यांनी केली आहे. या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे तसंच त्यासोबत कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेची यादी जोडण्याचे आदेश न्यायालयाने वाधवान पितापुत्रांना दिले होते.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) ६७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) चे प्रवर्तक राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर ईडीने सुमारे ७ हजार पानांचं आरोपपत्र सादर केलं.



हेही वाचा-

टाटा समूहाला झटका, सायरस मिस्त्रीच कंपनीचे अध्यक्ष!

आधार - पॅन लिंक करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा