Advertisement

आधार - पॅन लिंक करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख

सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता शेवटची संधी दिली आहे. जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.

आधार - पॅन लिंक करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख
SHARES

सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता शेवटची संधी दिली आहे. जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होणार आहे. लिंक करण्यासाठी आता ३१ डिसेंबर २०१९ ही शेवटची तारीख आहे.  आयकर विभागाने एक मेसेज प्रसिद्ध करत नागरिकांना आधार-पॅन लिंक करण्याचं आवाहन केलं आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर अनेक सरकारी, बँकिंग, इन्कम टॅक्स भरण्याची कामे करण्यात अडथळे येतात. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना आयटीआर भरताना आपला आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक सांगणं अनिवार्य आहे. 

असं करा लिंक

इन्कम टॅक्स विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाईवरुन आधार-पॅन लिंक करता येईल.  तसंच एसएमएसच्या माध्यमातूनही  आधार-पॅन लिंक करता येणार आहे.  एसएमएसच्या माध्यमातून आधार-पॅन लिंक करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर UIDPAN लिहून स्पेस देत १२ अंकी आधार नंबर नंतर स्पेस देत १० अंकी पॅन नंबर लिहून एसएमएस सेंड करावा लागेल.हेही वाचा -

NEFT ची सुविधा आता २४ तास

आता फ्री इंटरनेटच्या मदतीनं करा कॉल, 'या' कंपनीची नवी सेवा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा