Advertisement

NEFT ची सुविधा आता २४ तास

आधी एनईएफटी व्यवहार सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत करता येत होते.

NEFT ची सुविधा आता २४ तास
SHARES

बँकिंग व्यवहार आणि मोबाइल नंबर पोर्टिंग (MNP) चे नियम सोमवारपासून बदलले आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार १६ डिसेंबरपासून बँक ग्राहकांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) ची सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता बँक ग्राहक कोणत्याही दिवशी आणि कधीही एनईएफटीमार्फत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकतात. 

यापूर्वी एनईएफटी सेवा २४ तास नव्हती. आधी एनईएफटी व्यवहार सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत करता येत होते. आता ही सुविधा २४ तास सुरू झाली. आरबीआयने १६डिसेंबरपासून बँकाना आपल्या ग्राहकांना २४ तास राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधा देण्याचे निर्देश दिले होते. आरबीआयने बँकांना यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी रोकड उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश दिले होते. 

एनईएफटी म्हणजे काय?

एनईएफटी म्हणजे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. एनईएफटीचा उपयोग इंटरनेटद्वारे २ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी केला जातो. याद्वारे कोणत्याही शाखेच्या कोणत्याही बँक खात्यातून कोणत्याही शाखेच्या बँक खात्यात पैसे पाठवता येतात. यासाठी एक अट आहे की, पैसे पाठवणारा आणि मिळणारा या दोघांकडेही इंटरनेट बँकिंग सेवा असणं आवश्यक आहे. जर दोन्ही खाती एकाच बॅंकेची असतील तर काही सेकंदात पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात.



हेही वाचा -

आता फ्री इंटरनेटच्या मदतीनं करा कॉल, 'या' कंपनीची नवी सेवा




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा