झाकीर नाईकला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे : ईडी

नाईकविरोधात २०१६ मध्ये बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (uapa) अंतर्गत गुन्हा नोंदवत ‘ईडी’ त्याची सर्व खाती गोठवली आहे. तपासात त्याने १९३ कोटींचा मनीलॅण्ड्रींग केल्याचे ही पुढे आले आहे. न्यायालयीन कारवाईचा भाग म्हणून ईडीने त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची

झाकीर नाईकला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे : ईडी
SHARES

कुठलीही नोकरी वा उद्योगधंदा नाही, उत्पन्नाचा कुठलाही अधिकृत स्त्रोत नसताना वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या बँक खात्यात ४९.२० कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं. वारंवार न्यायालयाच्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या विजय मल्ल्याप्रमाणे झाकीर नाईकलाही फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याची मागणी ईडीने सोमवारी विशेष न्यायालयात केली. फरा

दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे तसंच प्रक्षोभक भाषणं करून तरूणांची माथी भडकवणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला झाकीर नाईक सध्या फरार आहे. नाईकविरोधात २०१६ मध्ये बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (uapa) अंतर्गत गुन्हा नोंदवत ईडीने त्याची सर्व खाती गोठवली आहे. तपासात त्याने १९३ कोटी रुपयांचे मनी लॅण्ड्रींग केल्याचंही पुढं आलं आहे. न्यायालयीन कारवाईचा भाग म्हणून ईडीने त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ईडीने त्याच्याविरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सुनावणी सोमवारी विशेष न्यायालयात होती. त्यावर बाजू मांडताना ईडीने न्यायालयाला सांगितलं की, नाईकच्या खात्यातून १९३.०६ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. हा पैसा मुंबई-पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात गुंतवण्यात आला आहे. यातही काही रक्कम झाकीर नाईक याच्याशी संबंधित हार्मोनी मीडियातही गुंतवण्यात आली आहे. चेन्नईतील बांधकाम सुरू असलेली शाळा तसंच म्युच्युअल फंडातही या पैशातून गुंतवणूक करण्यात आल्याचा युक्तिवाद ईडीने केला होता. तसंच झाकीर हा वारंवार सुनावणीला गैरहजर राहत आहे. त्याच्या विरोधात अजामीन वाॅरटंही बजावण्यात आलं आहे. त्यामुळे झाकीरला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करावं, असं मत ईडीने न्यायालयात मांडलं आहे. ईडीच्या या अर्जावर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.हेही वाचा -

रेल्वेच्या तिजोरीतून लूट, ४४ लाखांची रोकड चोरीला

भूलेश्वरमधून ६६ लाखांची रोकड जप्त
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा