रेल्वेच्या तिजोरीतून लूट, ४४ लाखांची रोकड चोरीला

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसमधील तिकिट घरातून तब्बल ४४ लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशांच्या एका दिवसाच्या तिकिटांतून जमा झालेली ही रक्कम होती.

रेल्वेच्या तिजोरीतून लूट, ४४ लाखांची रोकड चोरीला
SHARES
कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसमधील तिकिट घरातून तब्बल ४४ लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशांच्या एका दिवसाच्या तिकिटांतून जमा झालेली ही रक्कम होती. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या चोरीत ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

घटना उघडकीस

 लोकमान्य टिळक टर्मिनसवर तक्रारदार सुनील तेलतुंबडे हे चिफ बुकिंग सुपरवायझर म्हणून काम पाहतात. दीड वर्षांपासून ते कुर्ला टिळक टर्मिनलवर कार्यरत आहेत. चोरी झालेल्या ठिकाणची जबाबदारी ही मुख्य बुकिंग सुपरवायझर एस.के.चौधरी यांच्यावर होती. मात्र ते १६ सप्टेंबरपासून सुट्टीवर गेल्याने तेलतुबंडे हे प्रभारी म्हणून काम संभाळत होते. दिवसभर ३ ड्युटींमध्ये जमा झालेली कॅश तिजोरीत ठेवण्यात येते. तिजोरीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

सीसीटीव्ही नाही

२२ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रात विनोद पिल्ले यांच्या निदर्शनाखाली ६ अधिकारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यरत होते. त्यानंतर समीर ताहराबादकर यांच्या निदर्शनाखाली सजित नायर, रतिश झा, हरिशचंद्र, झम्मन मिना, पंकजकुमार सिंग हे कर्मचारी कार्यरत होत. या टिमची ड्युटी रात्री १२ वा. संपल्यानंतर रात्री याच ६ जणांना तिसऱ्या शिफ्टसाठी पुढे कार्यरत व्हायचं होतं. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या या ताहराबादकर यांच्याकडेच होत्या.

दरम्यान २३ सप्टेंबरच्या रात्री झम्मन या दिवसातील रक्कम तिजोरीत ठेवण्यासाठी गेल्या असता. तिजोरीतून सर्व कॅश चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. झम्मन यांनी याबाबत २ वा.च्या सुमारात तेलतुंबडे यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. तिजोरीतून तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१  रुपये चोरीला गेले होते. या चोरीची माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

तपास सुरू

घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना असंख्य अडचणी येत आहे. या प्रकरणात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का? सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबीने याचा तपास सुरू असून गुन्हा कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.



हेही वाचा-

पोलिस जिमखान्यातील वाद शिगेला

नायर रुग्णालयातील मृत राजेश मारूच्या कुटुंबाला १० लाखांची भरपाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा