पोलिस जिमखान्यातील वाद शिगेला

फोर्स वनच्या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास विनंती केली असता. त्यावरून फोर्सवनचे अधिकारी आणि सहा निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाला.

पोलिस जिमखान्यातील वाद शिगेला
SHARES

मुंबई पोलिसांच्या जिमखान्यातील ज्येष्ठ सभासद आणि पोलिस आयुक्तांमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. ज्या सहा सभासदांना आयुक्तांनी तडकाफडकी काढून टाकले त्या ज्येष्ठ सभासदांनी आता आयुक्तांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आयुक्त विरूद्ध निवृत्त पोलिस सभासधआँमधील वाद आता संपण्याची चिन्हे धुसर होत चालली आहेत.  

मुंबई पोलिस दलातील निवृत आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मरीन ड्राइव्ह येथे पोलिस जिमखान्याची उभारणी कित्येक वर्षांपूर्वी करण्यात आली. या जिमखान्याचा कारभार हा मुंबई पोलिस आयुक्तांच्या निदर्शनाखाली चालतो. दरम्यान केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरातील प्रमुख शहरांत २६/११ सारखा हल्ला होण्याची भीती होती. त्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनचे कमांडो मुंबईत आणण्यात आले होते. या कमांडोजची पोलीस जिमखान्यात व्यवस्था करण्यात आली होती.

कमांडो जिमखान्यात आले त्यावेळीच्या लॉनवर जिमखान्याचे सहा ज्येष्ठ सदस्य निवृत्त अधिकारी हे बसले होते. फोर्स वनच्या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास विनंती केली असता. त्यावरून फोर्स वनचे अधिकारी आणि सहा निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाला. हा वाद कालांतराने मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर आयुक्तांनी त्या सहाही ज्येष्ठ सदस्यांना जिमखान्याच्या सदस्यपदावरून तडकाफडकी काढले. आपले म्हणणे ऐकून न घेता आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा अन्यायकारी वाटल्याने निवृत्त अधिकाऱ्यांनी सीटी सिव्हिल व मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याबाबतचे कॅव्हेट न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. जिमखान्यातील अधिकारी व आयुक्तांचा वाद पेटणार असून एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आयुक्त वागत असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई

अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा