Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई

मागील दोन महिन्यात तब्बल १२ हजार ३७७ जणांवर कारवाईचा बडघा उगारत बेशिस्त वाहन चालकांकडून २० लाख ७९ हजारांचा दंड हस्तगत केला असल्याची माहिती पळस्पे केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई
SHARES
Advertisement

मुंबईत ऐन पावसाळ्यात एक्सप्रेसवेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. महामार्ग पोलिसांनी बेशिस्त १२ हजार ३७७ चालकांवर केलेल्या धडक कारवाईत २० लाखांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईबरोबरच महामार्गावर लेन कटिंग करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांचे वाहन परवाना किंवा त्यांच्या वाहनांचे परमिट रद्द करण्याचे प्रस्तावदेखील पाठवण्याची तयारी महामार्ग पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एक्स्प्रेस वे वरील बेशिस्तीला आणि पर्यायाने अपघातांना आळा घालण्यासाठी 'लेन कटिंग' करणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावला आहे. वाहनचालकांकडून 'लेन कटिंग' किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेकिंग करण्याचे प्रकार थांबत नसल्याने अनेक अपघात घडले होते. हे अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी जुलै महिन्यांपासून ही धडक कारवाई सुरू केली. या कारवाई दरम्यान महामार्ग पोलिसांनी मागील दोन महिन्यात तब्बल १२ हजार ३७७ जणांवर कारवाईचा बडगा उगारत बेशिस्त वाहन चालकांकडून २० लाख ७९ हजारांचा दंड हस्तगत केला असल्याची माहिती पळस्पे केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.

तर दुसरीकडे ई-चलानद्वारे दंडवसुलीकडंही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. मागील सहा महिन्यांत राज्यात ४० लाख ९७ हजार ६ ई-चलानमधील दंड वसुली झालेली नाही. यात वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांनी २०० रुपये ते एक हजापर्यंत दंडाची रक्कम अदा न केल्याची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे काही चालकांकडून १० हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतची रक्कम वाहतूक पोलीस विभागाला येणं बाकी आहे. दिवसेंदिवस ई-चलान न भरलेल्यांची संख्या वाढत असल्याने ती वसूल करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून दंड वसुली केली जाणार आहे. दंड न भरलेल्या चालकांना पत्राद्वारे माहिती देण्याबरोबरच, मोबाइल क्रमांकाची नोंदणी असल्याने त्या क्रमांकावर चालकाला फोन करून दंड भरण्यास सांगितलं जाईल. तात्काळ दंड वसुलीही यापुढे कठोरतेने केली जाईल. दंड भरला नाही, तर नियमानुसार वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते, असं महामार्ग पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.हेही वाचा -

अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा

मुंबईतून ३३ लाखांचा गुटखा जप्त
संबंधित विषय
Advertisement