भांडुपमध्ये क्रिकेटपटूची हत्या

तिघा जणांनी अचानक लोकंडी राॅड आणि धार धार शस्त्राने हल्ला करून आरोपींनी पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राकेशला स्थानिकांनी रुग्णालयात नेले.

भांडुपमध्ये क्रिकेटपटूची हत्या
SHARES

भांडुपच्या महावीर पेट्रोलपंपावर बुधवारी रात्री एका युवा क्रिकेटपट्टूची अनोळखी मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  राकेश पवार असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


पूर्व वैमन्यसातून हत्या

भांडुपच्या चंदनवाडी परिसरात राहणारा राकेश हा उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून प्रसिद्ध होता. गुरूवारी रात्री राकेश हा एकटाच एलबीएस रोडवरील महावीर पेट्रोलपंप परिसरातून रात्री साडे अकराच्या सुमारास जात होता. त्यावेळी त्यांच्यावर तिघा जणांनी अचानक लोकंडी राॅड आणि  धार धार शस्त्राने हल्ला करून आरोपींनी पळ काढला. या हल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राकेशला स्थानिकांनी जवळील रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.  


मारेकरी सीसीटिव्हीत कैद

या हत्येची माहिती मिळाल्यानंतर भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा हत्येचा प्रकार जवळील पेट्रोलपंपावरील सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटिव्ही ताब्यात घेतले आहेत. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवणारा अटकेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा