शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवणारा अटकेत

शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटिनच्या काड्या आणि धमकी देणारे पञ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सुरक्षा यंञणांनी ही या संपूर्ण गोष्टीचा पाठ पुरावा केला.

शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवणारा अटकेत
SHARES


प्रेयसीच्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका महाभागाने शालिमार एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आनंद वानखडे याला अटक केली आहे.  आरोपीने लिहून ठेवलेल्या मोबाइल क्रमांकामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरेश कांबळे यांनी सांगितले. 


जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने खळबळ

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल येथे उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटिनच्या काड्या आणि धमकी देणारे पञ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सुरक्षा यंञणांनी ही या संपूर्ण गोष्टीचा पाठ पुरावा केला. त्यावेळी यार्ड परिसरात एक्सप्रेस उभी असताना वानखडेने एक्सप्रेसमधून संशयास्पद उतरताना सीसीटिव्हीत आढळून आले.

सीसीटिव्हीमुळे पटली आरोपीची ओळख

.पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने वानखडेची ओळख पटवून त्याचा माघ काढण्यास सुरूवात केली.   त्याच दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी आढळलेल्या एका मोबाइल क्रमांकाचा माघ काढण्यास सुरूवात केली.  त्यावेळी त्या मोबाइलवरून एका महिलेच्या क्रमांकावर वारंवार फोन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरूवात केली.  त्यावेळी पाहिजे आरोपीचे लोकेशन आणि माग काढत असलेल्या आरोपी अकोला येथे पळून गेल्याचे कळाले. त्यानुसार गुरूवारी पोलिसांनी वानखडेला अकोल्यातून अटक केली.  प्राथमिक माहितीत त्याने प्रेयसीच्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची कबूली दिली. तसेच कुणाला संशय येऊ नये. म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचा उल्लेख पञात करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा

पुलावर धमकीचा संदेश: एकजण पोलिसांच्या ताब्यात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा