कुर्लात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

मुंबईतील कुर्ला (kurla) येथील साबळे नगर भागात चार जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

कुर्लात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक
SHARES

मुंबईतील कुर्ला (kurla) येथील साबळे नगर भागात चार जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. ही महिला मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) येथे पायी जात होती. यावेळी चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिचे मंगळसूत्र व पैसेही हिसकावले. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावे आहेत.

 वरळी (Worli) येथे राहणाऱ्या महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती काम करून आपल्या दोन लहान मुलांचा उदरनिर्वाह करत होती. सोमवारी रात्री ती भायखळाहून लोकल ट्रेनने अकराच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक (Kurla Railway Station) येथे उतरून मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) येथे पायी जात होती. यावेळी साबळे नगर येथील झाडीमध्ये ती लघुशंकेसाठी गेली. या ठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच तिथे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून घेऊन तिच्यावर बलात्कार (rape) केला. त्यावेळी  सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांनीही महिलेला मदत करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला. 

आरोपींनी महिलेजवळील ३ हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे मंगळसूत्रही हिसकावले. त्यानंतर आरोपी पळून गेले. मात्र, हा प्रकार पाहून हे पाहून एका महिलेने पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून बोलावले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत काही तासातच आरोपींना अटक केली. सर्व आरोपींचे वय २३ ते २४ असल्याचं पोलिसांनी सांगितलं.  नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महिलेची वैद्यकीय चाचणी केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (accused) हे कुर्ला (kurla) परिसरातच राहणारे आहेत. त्यातील एकावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर एक आरोपी सेल्समन आणि एक रिक्षा चालक आहे. 

तीन महिन्यांपूर्वी, नोव्हेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूर (kanpur) येथून मुंबईत (mumbai) आलेल्या एका महिलेवर तिघांनी बलात्कार (rape) केला होता. या प्रकरणी दीपू गौतम आणि अब्दुल शेख यांना अटक करण्यात आला होती. त्या पूर्वी चुनाभट्टी स्थानक परिसरातही औरंगाबादहून आलेल्या एका मुलावर बलात्कार करण्यात आला होता.



हेही वाचा -

डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून मोटरसायकलस्वाराची हत्या, रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद

लाच घेतल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा