लाच घेतल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ परिक्षेत्रात १२ महिन्यांत ८३९ गुन्ह्यांची नोंद करत तब्बल ११०० आरोपींना बेड्या ठोकल्या.

लाच घेतल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक
SHARES

खाद्यपदार्थाची विक्री करण्यासाठी लागणाऱ्या परवान्याकरिता दीड लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पालिके(BMC)च्या अधिकाऱ्याला लाच लुचपत विभागा(ACB)च्या अधिकाऱ्यांची रंगेहाथ अटक केली आहे. परेश कोरगावकर असे या निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहे. 

हेही वाचाः- मुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती

  मालाड (Malad) येथील पालिकेच्या पी उत्तर कार्यलयात  परेश कोरगावकर हे कार्यरत आहे. आरोपी हा अनेकांकडून लाच घेत असल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंध विभागाला होता. त्यानुसार त्यांनी आरोपीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपीने एका दुकानदाराला खाद्य पदार्थाच्या विक्रीकरिता तब्बल दिड लाखाची मागणी केली होती. ही माहिती लाचलुचपत विभागाला कळल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात सापळा रचत त्याला रंगे हाथ पकडले.

हेही वाचाः- महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च

मालाड येथे एका विक्रेत्याचे भूमी स्टोअर्स हे दुकान आहे. तसेच आपल्या दुकानात इतर वस्तूप्रमाणे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी संबंधित दुकानदाराने परेश यांच्याकडे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या परवान्यासाठी मदत मागितली. त्यावेळी परेशने दुकानदाराकडे तब्बल दिड लाख रुपयांची मागणी केली, अशी माहिती विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने परेश याच्याविरोधात सापळा रचत त्याला लाच घेताना रंगे हाथ पकडले आहे. त्यावेळी परेश याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

हेही वाचाः-वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम फेब्रुवारीमध्ये होणार सुरू

लाच घेणे आणि देणे हे कायद्याने गुन्हे असताना अनेक पालिकेचे अधिकारी काही लोकांकडून लाच घेत असल्याचे समजते आहे. अशाप्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याससाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र किती केल्या पालिकेतील भ्रष्टाचार (Corruption) थांबण्याचे नाव घेत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ परिक्षेत्रात १२ महिन्यांत ८३९ गुन्ह्यांची नोंद करत तब्बल ११०० आरोपींना बेड्या ठोकल्या. नोंदवण्यात आलेल्या ५४ प्रकरणांमध्ये फक्त ६२ आरोपींविरोधातच दोषारोपपत्र सिद्ध करण्यात एसीबीला यश आले आहे. तर ८३ टक्के गुन्ह्यांमध्ये अद्याप एसीबीला आरोपींविरोधात गुन्हे सिद्ध करता आले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात मुंबईच्या ३७ प्रकरणांपैकी फक्त ५ प्रकरणांमध्ये एसीबीला दोषारोपपत्र सिद्ध करण्यात यश आले आहे.

हेही वाचाः- पोलिसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना

आरोपी का सुटतात?

 लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला पकडण्यासाठी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये असे रेकॉर्डिंग तांत्रिक कारणे देत रिजेक्ट केले जाते.

 विविध प्रकरणांमध्ये सापळा रचताना एकाच अधिकाऱ्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे 'प्रत्येक वेळी हाच अधिकारी का?' असा प्रश्न उपस्थित होऊन पुराव्याअभावी संशयित सुटतात.

आजही अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी पुरेशी तयारी न करताच, सापळे रचून कारवाई करतात. याचाच फायदा घेऊन आरोपींचे वकील न्यायालयात ही कारवाई कशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली, हे दाखवून आरोपींची निर्दोष मुक्तता करतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा