Advertisement

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम फेब्रुवारीमध्ये होणार सुरू

वांद्रे ते वर्सोवा या सी-लिंकच्या (Bandra-Versova Sea-link) कामाला फेब्रुवारी (February) महिन्यात सुरूवात होणार आहे.

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम फेब्रुवारीमध्ये होणार सुरू
SHARES

मुंबईतील वांद्रे ते वर्सोवा या सी-लिंकच्या (Bandra-Versova Sea-link) कामाला फेब्रुवारी (February) महिन्यात सुरूवात होणार आहे. वांद्रे-वर्सोवा दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होते. या वाहतुक कोंडीमुळं (Traffic Issue) प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळं या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून समुद्रात ९ किमीच्या या लिंक रोडच्या कामाला मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. मात्र, आता जमिनीवरील काम वेगात सुरू असून समुद्रातील कामाला सुरुवात होणार आहे.

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं बांधकाम (Construction) बऱ्याच काळापासून रखडलं होतं. जुहू बीचवरील कास्टिंग यार्डची जागा, खारफुटी तोडण्यासाठी परवानगी या मुद्द्यावरून या लिंक रोडचं (Link Road) काम रखडलं होतं. याबाबत न्यायालयात याचिकादेखील दाखल झाल्या होत्या. अखेरीस डिसेंबर २०१९ मध्ये वांद्रे येथील जमिनीवरील कामाला सुरुवात झाली.

वांद्रे येथील काम वेगानं सुरू असून, फेब्रुवारीपर्यंत समुद्रातील कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. वांद्रे येथील सुरुवातीच्या जोड रस्त्याचं (Link Road) काम सुमारे १ किमी असून, ते लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र, कास्टिंग यार्डचं काम सुरू झालं नसलं तरी सी-लिंकच्या कामावर काहीही परिणाम होणार नसल्याचं समजतं. सी-लिंकच्या सुपर स्ट्रक्चरच्या (Super Structure) सेगमेन्टचं काम सुरू झाल्यावर कास्टिंग यार्डची (Casting Yard) आवश्यकता भासणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • मुख्य सेतू ९.६० किमी – ४+४ पदरी
  • केबल स्टेड पूल ०.३० किमी
  • वांद्रे जोड रस्ता १.१७ किमी
  • कार्टर रोड रस्ता १.८० किमी
  • जुहू कोळीवाडा अंतर्गत जोड रस्ता १.८० किमी
  • नाना-नानी पार्क जोड रस्ता १.८० किमी

सध्या पाईलिंग, पीअर उभारणीचं काम सुरू आहे. या सी लिंकच्या गर्डरसाठी कास्टिंग यार्डच्या जागेचा प्रश्न अजून पुरता सुटलेला नाही. २ वेळा निविदा मागवल्यानंतर देखील एकच प्रतिसाद मिळाल्यानंतर सध्या त्या जागेच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचं समजतं. कास्टिंग यार्डसाठी खासगी जागेचा पर्याय असून ही जागा सुमारे २० एकर इतकी आहे.

मालाड-मार्वे रोडवरील या जागेवर सुमारे ११३ सातबारे असल्यामुळं जागेच्या मालकी हक्काची छाननी सुरू असल्याची माहिती मिळते. मागील वर्षी कास्टिंग यार्डच्या जागेवरून प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. जुहू बीचवरच कास्टिंग यार्ड प्रस्तावित होतं. परंतु, त्यावर झोरू भथेना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेरीस महामंडळाने नवीन जागेसाठी निविदा मागवल्या. या सी लिंकचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने रिलायन्स इन्फ्राला दिले असून, ५ वर्षांत काम पूर्ण करायचे आहे.



हेही वाचा -

महापालिका उभारणार महालक्ष्मीला रेल्वे मार्गावर २ पूल

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा