Advertisement

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च

यंदा महापालिकेनं आपल्या प्रकल्पांऐवजी (Projects) बेस्टवरच (BEST) जास्त लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च
SHARES

महापालिकेनं (BMC) २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी ३०,६९२.५९ कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला होता. या आकडेवारीनुसार, अर्थसंकल्पातील केवल ४५ टक्के निधी खर्च करण्यात आल्याचं समजतं. परंतु, यंदा महापालिकेनं आपल्या प्रकल्पांऐवजी (Projects) बेस्टवरच (BEST) जास्त लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, अर्थसंकल्पातील निधीपैकी एक तृतीयांश भाग बेस्टवर खर्च झाला आहे.

महापालिकेनं ३१ डिसेंबपर्यंत भांडवली तरतूदींमधून ५८६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आर्थिक खाईतून बेस्टला वाचवण्यासाठी बेस्टला निधी देण्याची तयारी महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांनी दाखवली. यंदाच्या वर्षांत तब्बल १८३६ कोटी रुपये बेस्टला (BEST) देण्यात आले आहे. त्याशिवाय, ३०,६९२.५९ कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला असून, यामध्ये रस्ते, पूल, आरोग्य, पाणी, विकास नियोजन, घनकचरा, पर्जन्य जल वाहिन्या अशा विभागांतील भांडवली खर्चासाठी ११,४८०. ४२ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत या अंदाजपत्रकातील भांडवली तरतूदींपैकी केवळ ४४.४६ टक्के निधी वापरला गेला आहे. म्हणजेच भांडवली तरतूदींपैकी ५८६५.६८ कोटींचा निधी खर्च झाला आहे. मागील वर्षी डिसेंबरपर्यंत ३७.७४ टक्के निधीचा वापर झाला असून, याच्या तुलनेत यंदा ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, यंदा महापालिकेनं यावेळी आपल्या ठेवी मोडून बेस्टला १८३६ कोटींचा निधी दिला आहे.

हेही वाचा - महापालिका उभारणार महालक्ष्मी रेल्वे मार्गावर २ पूल

बेस्टला दरमहा १०० कोटी देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. त्यानुसार, वर्षांचे १२०० कोटी आणि भाड्यानं बसगाड्या घेण्यासाठी निधी असे हे १८०० कोटी आतापर्यंत देण्यात आले आहेत. दरम्यान, एका बाजूला महापालिकेचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटलेलं आहे. या आर्थिक वर्षांत २५ हजार ५१३ कोटींचं उत्पन्न अपेक्षित असताना नोव्हेंबरमध्ये फक्त १२ हजार ९३० कोटी उत्पन्न गोळा झाले आहे.

महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यातच महापालिकेनं आपल्या खर्चातील एक तृतीयांश भाग हा बेस्टसाठी खर्च केला आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूदी गेल्यावर्षी ३७ टक्के वापरण्यात आल्या होत्या. तर त्याआधीच्या वर्षी ३१ टक्के निधी वापरण्यात आला होता.



हेही वाचा -

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम फेब्रुवारीमध्ये होणार सुरू

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा