Advertisement

मुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती

उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे.

मुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती
SHARES

देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिके (BMC)त लिपीक पदासाठी महाभरती होणार आहे.  महापालिकेने ही पदे भरण्यासाठी महाआँनलाइन लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. ही भरती प्रक्रिया (Recruitment process) ऑनलाइन परीक्षा घेऊन राबवली जाणार आहे. या परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचाः- महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च

भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे., बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला. पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत.

हेही वाचाः-महापालिका उभारणार महालक्ष्मी रेल्वे मार्गावर २ पूल

या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचाः- मुंबईमध्ये दीड वर्षांत ८१ हजार किलो प्लास्टिक जमा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा