Advertisement

लोकलमध्ये 'या' कारणांमुळे लागली मराठी पाटी

अज्ञांतांनी या फलकावर अलार्म फलक मराठी भाषेत नसल्याने लोकलमध्ये 'इथे मराठी हवीच', असे स्टिकर्स लावले.

लोकलमध्ये 'या' कारणांमुळे लागली मराठी पाटी
SHARES

मुंबईच्या लोकलमध्ये लावण्यात आलेल्या हिंदी सूचना फलका (Hindi information board)वर काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी ‘इथे मराठी हवीच’ असे स्टिकर लावण्यात आले होते. या स्टिकरची चर्चा सोशल मिडियासह लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत होते. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने अखेर मराठी संदेश (Marathi board) असलेले अलार्म फलक लोकलमध्ये लावले आहेत.

हेही वाचाः- मुंबईत १२५ चिनी ड्रोन जप्त- सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबईच्या लोकल(Mumbai local)मध्ये दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. रेल्वेत बहुतांश सूचना फलक हे हिंदीत आहेत. त्यामुळेच राज्यातच मराठी भाषेची होत असलेली उपेक्षा चर्चेचा विषय ठरत होती. त्यातच अज्ञांतांनी या फलकावर अलार्म फलक मराठी भाषेत नसल्याने लोकलमध्ये 'इथे मराठी हवीच', असे स्टिकर्स लावले. या स्टिकर्सची चर्चा दिवसेंदिवस रंगू लागल्या, सोशल मिडियावर ही त्याबाबतच्या प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली.

हेही वाचाः-हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

रेल्वे प्रशासना(Railway administration)ने हिंदी आणि इंगज्रीत संदेश असणारी पाटी कायम ठेवून त्यावर मराठीत संदेश असलेला छोटा फलक लावण्यात आला आहे. 'गाडी उभी करण्यासाठी साखळी ओढावी', असा मराठी संदेश असणाऱ्या या फलकावर इतर सुचना देखील मराठीत नमूद करण्यात आल्या आहेत. आंदोलन न करता स्टिकर लावणाऱ्या अज्ञात मराठी भाषाप्रेमीच्या गांधीगिरीचे कौतुकही झाले. अखेर रेल्वेनेही या मराठी भाषाप्रेमीच्या माणगीची दखल घेतली.

हेही वाचाः- बेस्ट बसही २४ तास सुरू राहणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा