Advertisement

तेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा

अत्याधुनिक सुविधा असलेल्या तेजस एक्स्प्रेस (tejas express) ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता तेजस एक्स्प्रेसला २४ जानेवारीपासून अतिरिक्त डबा (coach) जोडण्यात येणार आहे.

तेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा
SHARES

अहमदाबाद (Ahmedabad)-मुंबई सेंट्रल ( Mumbai Central)-अहमदाबाद मार्गावर १७ जानेवारीपासून तेजस एक्स्प्रेस (tejas express) सुरू झाली आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या तेजस एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता तेजस एक्स्प्रेसला २४ जानेवारीपासून अतिरिक्त डबा (coach) जोडण्यात येणार आहे. अतिरिक्त डबा जोडल्याने या ट्रेनचे डबे आता ११ होणार आहेत. या अतिरिक्त डब्यामुळे एक्स्प्रेसमध्ये ७८ प्रवासी आसने वाढणार आहेत.

 प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आणि वाढती प्रतिक्षा यादी यामुळे तेजस एक्स्प्रेस ( tejas express) ला अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसी (irctc)ने दिली. सध्या ८ वातानुकूलित चेअर कार आणि २ एक्झिक्युटिव्ह श्रेणीचे डबे असे एकूण १० तेजस एक्स्प्रेसला आहेत. . २४ ते २९ जानेवारीपर्यंत हा अतिरिक्त चेअर कारचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येईल.

तेजस एक्स्प्रेस (tejas express) अहमदाबादमधून सकाळी ६.४० वाजता सुटेल आणि दुपारी १.१० वाजता मुंबईत पोहोचेल. ही ट्रेन नाडियाड, वडोदरा, भरूच, सूरत, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबणार आहे.

अमदाबाद ते मुंबई दरम्यान एक्झिक्युटीव्ह चेयर कारचं तिकीट २३८४ रुपये असेल. यामध्ये बेस फेयर १८७५ रुपये, जीएसटी ९४ रुपये आणि केटरिंग चार्ज ४१५ रुपये असेल. तर एसी चेयर कारचं तिकीट १२८९ रुपये असेल. ज्यात बेस फेयर ८७० रुपये, जीएसटी ४४ रुपये आणि केटरिंग चार्ज ३७५ रुपये असेल.  तेजस एक्स्प्रेसला जर एक तास उशिर झाला, तर प्रवाशांना १०० रुपये भरपाई मिळणार आहे. जर दोन तास उशिर झाला तर प्रवाशांना २५० रुपये भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसमध्ये एकूण ७५८ जागा आहेत. यापैकी ५६ जागा या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी आरक्षित असतील, तर इतर जागा एसी चेअर क्लास असतील. या गाडीतील प्रवाशांचा २५ लाख रुपयांचा प्रवासी विमाही काढला जातो.

तेजस एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये

  • ट्रेनचा वेग १६० किलोमीटर प्रति तास 
  • प्रत्येक सीटच्या मागे स्वतंत्र एलईडी स्क्रीन
  • वायफायची सुविधा
  • खाद्यपदार्थ आणि पर्यटनाची व्यवस्था आयआरसीटीसीद्वारे नियंत्रीत
  • तिकीटांचं आरक्षण फक्त आॅनलाइनद्वारे होणार
  • ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल, तर गुरूवारी मेंटेनन्स करण्यात येईल
  • ५ हून अधिक वयाच्या मुलांचं पूर्ण तिकीट लागेल, त्यांनाही वेगळी सीट देण्यात येईल
  • या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला २५ लाख रुपयांचा विमा मोफत मिळेल
  • १ तासापेक्षा जास्त उशीराने आल्यास आयआरसीटीसी प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये नुकसान भरपाई देईल
  • ट्रेन २ तासांहून जास्त काळ उशीराने आल्यास प्रवाशांना प्रत्येकी २५० रुपये मिळतील
  • परदेशी पर्यटकांसाठी १८ सीट आरक्षित असतील



हेही वाचा -

शुक्रवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर दुरूस्तीची कामं

महिलांना रेल्वे जवान सोडणार घरापर्यंत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा