महिलांना रेल्वे जवान सोडणार घरापर्यंत

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी (Women Passengers) आनंदाची बातमी आहे

SHARE

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी (Women Passengers) आनंदाची बातमी आहे. कारण आता मध्य रेल्वेकडून (Central Railway) महिला प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेत (Passengers Safety) वाढ करण्यात येणार आहे. पुरुषांप्रमाणं अनेक महिला आता रात्री उशिरा घरी परतात. त्यामुळं रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईतील महिलांना लवकरच रेल्वेच्या जवानांचा आधार मिळणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना घरापर्यंत अथवा इतर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी 'कॉल करा, आरपीएफ बोलवा' ही योजना राबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या (Central Railway) रेल्वे सुरक्षा बलानं (RPF) घेतला आहे. 

२६ जानेवारीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील (Central Railway Mumbai Division) महिलांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेनुसार रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ या वेळेत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आरपीएफ जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रेल्वे हेल्पलाइन क्रमांक (Railway helpline number) १८२ वर दूरध्वनी करून महिलांना रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ दरम्यान सुरक्षित प्रवासासाठी जवानांची मागणी करण्यात येणार आहे.

अनेक महिलांना कार्यालयीन कामाच्या व्यापामुळं (Work Load) रात्री उशिरापर्यंत महिलांना लोकलनं प्रवास करावा लागतो. त्यापैकी काही महिला प्रवासादरम्यान एकट्याच असतात. त्यामुळं संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलानं (RPF) ही योजना आखली आहे.

या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांवरील महिलांना एकट्यानं प्रवास करण्यास असुरक्षित वाटल्यास त्यांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२वर संपर्क साधावा. हेल्पलाइनवर संपर्क साधलेल्या महिला प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीनं आरपीएफ जवान किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (Maharashtra Security Force) कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. महिलांच्या मागणीनुसार सुरक्षित स्थळी पोहोचेपर्यंत हे जवान त्यांच्या सोबत असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वे यार्ड आणि परिसरात महिलांवर होणारे हल्ले, चोरीच्या वाढत्या घटना आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून १० अतिसंवेदनशील स्थळी सीसीटीव्ही (CCTV) लावण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण यार्ड, ठाकुर्ली यार्ड, कुर्ला यार्ड आणि अन्य अतिसंवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. या सीसीटीव्हीचं निरीक्षण रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.हेही वाचा -

NRC, CAA विरोधात 'वंचित'चा महाराष्ट्र बंद

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या