Advertisement

NRC, CAA विरोधात 'वंचित'चा महाराष्ट्र बंद

नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) शुक्रवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Close) घोषणा केली आहे.

NRC, CAA विरोधात 'वंचित'चा महाराष्ट्र बंद
SHARES

नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) शुक्रवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Close) घोषणा केली आहे. वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बंदचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला राज्यातील तब्बल २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय महारष्ट्र बंदची हाक दिल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज झालं आहे.

देशभरात एनआरसी (NRC) आणि सीएए (CAA) विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडं वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र पुकारण्यात येत असल्याचं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा - काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत

याबाबत १६ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट बंद बाबत नमूद केलं होतं. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी (Political Party) सहभागी व्हावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं.

दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी व्हावा, यासाठी वंचितसह अन्य संघटनांच्या नेत्यांनी जनजागरणासाठी बैठका घेतल्या. बंदच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय व शहराच्या कार्यकारिणीची गुरुवारी वंचितची संयुक्त बैठक (Joint meeting) झाली. यास विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. 

हेही वाचा - अंबानींच्या बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसंच, सरकारी वा खासगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन बैठकीत करण्यात आलं. बंदला एमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघासह अन्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बैठकीत वंचितचे शहर अध्यक्ष रवी शेंडे, राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे आदी उपस्थित होते.



हेही वाचा -

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा