SHARE

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील अटालिया बंगल्यावर कार्यरत (CRPF) केंद्रीय सुरक्षा बल मधील एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामभाई बकोञा असे या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी गामदेवी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मूळचा गुजरातचा असलेला बकोञा हा उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे मागील अनेक दिवसांपासून सुरक्षेस होता. बकोञा हा सीआरपीएफचा जवान आहे. आज सायंकाळी बकोञा त्याची अँटोमँटीक रायफल घेऊन बंगल्याच्या पायऱ्या चढत होती. त्यावेळी त्याचा पाय घसरून त्याचा तोल गेला. त्यावेळी रायफलची सिलिंग कँप सरकून एकाच वेळी दोन गोळ्या सुटल्या, या अपघातात बकोञा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात नेहण्यात आले असता. डाँक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

याा प्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. बकोञा हे नैराक्षेतून कोणते ही पाऊल उचलले नसून अपघाताने ही घटना घडल्याचे स्पष्ठ केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या