Advertisement

शुक्रवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर दुरूस्तीची कामं

बोरिवली (Borivali) आणि राम मंदिर (Ram Mandir) स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक (Jambo Block) पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) घोषित करण्यात आला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर दुरूस्तीची कामं
SHARES

बोरिवली (Borivali) आणि राम मंदिर (Ram Mandir) स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक (Jambo Block) पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) घोषित करण्यात आला आहे. शुक्रावारी मध्यरात्री (Mid-Night) हा ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रावारी रात्री ११.४५ ते शनिवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ५ तासांचा हा ब्लॉक असून, पाचव्या मार्गिकेवर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळं रविवारी २६ जानेवारी रोजी घेण्यात येणारा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली.

हेही वाचा - माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

बोरिवली (Borivali) आणि राम मंदिर (Ram Mandir) स्थानकांदरम्यानच्या पाचव्या मार्गिकेसह अप जलद मार्गावर देखील ३ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक मध्यरात्री १२.१५ ते शनिवारी पहाटे ३.१५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा - पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल

रेल्वेच्या पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील शनिवारी व रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. या ब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांसह अनेक दुरूस्तीचं काम करण्यात येतात. त्यावेळी अनेक लोकलही रद्द करण्यात येतात. दरम्यान, येत्या रविवारी पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.हेही वाचा -

महाअधिवेशनापूर्वीच मनसेला गळती; धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा