Advertisement

अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञान

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वर वाढणारे अपघात रोखण्यासाठी आता ‘टॅक्टटाइल एजलाइन’ (Tactical Ageline) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांना पाठीमागून धडक बसून होणारे अपघात (Accident) कमी होतील.

अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञान
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वर वाढणारे अपघात रोखण्यासाठी आता ‘टॅक्टटाइल एजलाइन’ (Tactical Ageline) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांना पाठीमागून धडक बसून होणारे अपघात (Accident) कमी होतील. विशेष म्हणजे टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञानाचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात येणार आहे. 

 २०१९ मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वर झालेल्या अपघातांपैकी ५० टक्के अपघात वाहनांना पाठीमागून धडक होऊन झाले आहेत. डाव्या बाजूने ओव्हरटेक (Overtake) करणे आणि चालकाने पुरेशी विश्रांती न घेणे ही या अपघातांची कारणं आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांना जा-ये करण्यासाठी तीन मार्गिका आहेत. तर आणखी एक फोर्थ लेन किंवा पांढऱ्या रंगाची एजलाइन असते. ही चौथी मार्गिका एखाद्या वाहनाला अपघात झाला असेल तर त्या ठिकाणी थांबण्यासाठी आहे. मात्र, अनेक चालक या मार्गिकेचा वापर लेनप्रमाणे करतात. काही चालकांना रात्रीच्या वेळी थकवा येऊन झोप लागते. चालक रोड सोडून डाव्या बाजूने चौथ्या मार्गिकेवर जातात. त्यामुळे अपघात घडतात. या मार्गिकेवरून वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नही अनेक चालक करतात. त्यामुळेही अनेकदा अपघात (Accident) होतो. 

असं आहे तंत्रज्ञान

टॅक्टटाइल एजलाइन (Tactical Ageline) तंत्रज्ञानात डाव्या बाजूच्या चौथ्या मार्गिकेवर सहा इंचांच्या अंतराने लहान लहान एक ते दीड फुटांचे रमलर टाकण्यात येणार आहेत. रमलर (Rumler) मुळे  या मार्गिकेवर एखादे वाहन गेल्यास वाहनाला धक्का बसेल. जोरात आवाज येईल. त्यामुळे एखाद्या चालकाला झोप लागली तर त्याला जाग येईल. चालकाला डाव्या बाजूने वाहन चालविणंही कठीण होईल. परिणामी चालक ओव्हरटेक करणार नाही. त्यामुळे ओव्हरटेकमुळे आणि वाहनांना पाठीमागून धडक देऊन होणारे अपघात कमी होतील.

टॅक्टटाइल एजलाइन ( (Tactical Ageline)) तंत्रज्ञानाचा वापर परदेशात केला जातो. भारतात हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस ((Mumbai-Pune Expressway) वर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी अनेक अपघातही होतात. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 



हेही वाचा -

आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस

लोकलमध्ये या कारणांमुळे लागली मराठी पाटी





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा