Advertisement

मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची सूचना

कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी (mumbai police) भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास मनसेला परवानगी नाकारली आहे.

मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची सूचना
SHARES

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना (illigal bangladeshi and pakistani citizens) हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (mns) मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेकडून या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू असून भायखळा ते आझाद मैदान (byculla to azad maidan) दरम्यान मोर्चा काढण्याची परवानगी मिळावी यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे अर्जही केला होता. परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी (mumbai police) या मार्गावरून मोर्चा काढण्यास मनसेला परवानगी नाकारली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा- 'या' मार्गावरून निघणार मनसेचा मोर्चा, परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज

हा मोर्चा भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान (byculla to azad maidan) या मार्गावर काढण्यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे (mumbai police) परवानगी मागितली होती. मात्र मनसेचा मोर्चा हा मोहम्मद अली रोड (muhammad ali road) परिसरातील मुस्लीम बहुल (muslim area) भागातून जाणार असल्याने या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था (law and order) बिघडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शिवाय राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न पोलिसांसमोर आहे. त्यामुळे हा मोर्चा अन्य मार्गावरून नेण्याची सूचना मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर मनसेला केली आहे. 

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुस्लिम घुसखोरांवर कडाडून हल्ला चढवला होता. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्यासाठी प्रसंगी आपण केंद्र सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत. कलम ३७० (article 370) आणि राम मंदिर (ram mandir judegement) प्रकरणाच्या निकालाचा राग मनात असलेल्यांकडून सीएए आणि एनआरसीविरोधात (caa and nrc) मोर्चो काढले जात आहेत. या मोर्चात पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा किती सहभाग आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. त्यामुळे मोर्चाला उत्तर मोर्चाने असं म्हणत राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीच्या मोर्चाची हाक दिली होती. 

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा? राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं 

मनसे पदाधिकारी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत पोलिसांनी ही सूचना मनसेला केली. भायखळा ते आझाद मैदान या मार्गाऐवजी मोर्चा मरीन ड्राइव्ह (marine drive) इथून आझाद मैदानात नेण्यात यावा असा पर्यायही मुंबई पोलिसांनी सूचवला आहे. मनसेने हा पर्यायी मार्ग स्वीकारल्यास मरीन ड्राइव्हच्या हिंदू जिमखान्यापासून (hindu gymkhana) या मोर्चाची सुरूवात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलिसांच्या या सूचनेवर आता मनसेची काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा