Advertisement

'या' मार्गावरून निघणार मनसेचा मोर्चा, परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज

देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा निघण्याची शक्यता आहे.

'या' मार्गावरून निघणार मनसेचा मोर्चा, परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज
SHARES

देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना (illigal bangladeshi and pakistani citizens) हाकलून लावा, या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) माध्यमातून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा नेमका कुठून कुठे काढण्यात येणार यावर अजून शिक्कामोर्तब झालं नसलं, तरी भायखळा ते आझाद मैदान (byculla to azad maidan) दरम्यान हा मोर्चा काढण्याची तयारी मनसेने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हा मोर्चा भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान (byculla to azad maidan) या मार्गावर काढण्यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे  (mumbai police) परवानगी मागितली आहे. मात्र मनसेच्या या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न (law and order) निर्माण होऊ शकतो का? याचा आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे. मनसेचा मोर्चा हा मुस्लीम बहुल (muslim area) भागातून जाणार आहे. या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न पोलिसांसमोर आहे. त्यामुळे हा मोर्चा अन्य कुठल्या मार्गावरून वळवता येऊ शकतो का? हे मुंबई पोलिसांकडून तपासलं जात आहे. 

हेही वाचा- ‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे

तर, कायदा-सुव्यवस्थेचा (law and order) आढावा घेतल्यानंतर मुंबई पोलीस या मोर्चाला परवानगी द्यायची की नाही हे ठरवतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी सांगितलं. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला (mns rally) पोलीस परवानगी देणार का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. 

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुस्लिम घुसखोरांवर कडाडून हल्ला चढवला होता. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्यासाठी प्रसंगी आपण केंद्र सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत. कलम ३७० (article 370) आणि राम मंदिर (ram mandir judegement) प्रकरणाच्या निकालाचा राग मनात असलेल्यांकडून सीएए आणि एनआरसीविरोधात (caa and nrc) मोर्चो काढले जात आहेत. या मोर्चात पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा किती सहभाग आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. त्यामुळे मोर्चाला उत्तर मोर्चाने असं म्हणत राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीच्या मोर्चाची हाक दिली होती. 

दरम्यान हा मोर्चा काढून मनसे केंद्रातील भाजप सरकारला समर्थन देत आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दल खुलासा केला. ९ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी आहे. सुधारीत नागरिकत्व कायद्याला (caa) पाठिंबा देण्यासाठी नाही. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (nrc) वर चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.  

हेही वाचा- 'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पोलिसांकडे (mumbai police) मनसेने परवानगी मागितली आहे. मोर्चा आझाद मैदानात संपणार हे नक्की पण सुरु कुठून होणार हे पोलिसांनी परवानगी आल्यानंतर कळेल, असं मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी सांगितलं.

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा