Advertisement

‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे

मनसेच्या वतीने ९ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. मात्र हा माेर्चा केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर केवळ बांगलादेशी नागरिकांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारदेशी आणि पाकिस्तानी

‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) वतीने ९ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. मात्र हा माेर्चा (rally) केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला (caa) पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर केवळ बांगलादेशी (bangladeshi citizens) आणि पाकिस्तानी (pakistani citizens) नागरिकांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणार असल्याचा खुलासा पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

या मोर्चाची आखणी करण्यासाठी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना या बैठकीत जास्त वेळ बसता आलं नव्हतं. त्यांनी या बैठकीत काही मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं. परंतु हा मोर्चा काढून मनसे केंद्र सरकारच्या सीएए (caa) कायद्याला समर्थन देत आहे का? हे समर्थन एकप्रकारे भाजपला आहे का? असा गोंधळ मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात सुरू होता. त्यामुळे मंगळवारीही मनसेच्या प्रमुख नेत्यांची कृष्णकुंज निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली या बैठकीत राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या आयोजनामागची नेमकी भूमिका पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितली.

केंद्र सरकारच्या सीएए (caa) कायद्याला समर्थन देण्यासाठी नाही, तर भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी (illigal bangladeshi citizens) आणि पाकिस्तानी (illigal pakistani citizens)नागरिकांना देशातून हालकून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं. सीएएला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर नंतरहून चर्चा करता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात भाषण करताना राज ठाकरे (raj thackeray) यांनी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता. देशाबाहेरून आलेल्या घुसखोरांना पोसण्यासाठी भारत काय धर्मशाळा लागून गेलेली नाही. त्यामुळे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सीएए (caa) आणि एनआरसी (nrc)विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत. त्यातील घुसखोरांची संख्या हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं पाहिले. त्यासाठी मनसे ९ फेब्रुवारी काढणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं.


राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाजपला उघडपणे समर्थन दिल्याचं म्हटलं जाऊ लागलं. परंतु आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा