Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray) यांनी हिंदुत्वाची (hindutva) भूमिका स्वीकारल्यावर ‘राज ठाकरे हे रंगबदलू आहेत,’ अशी टीका ‘एआयएमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी केली होती.

तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray) यांनी हिंदुत्वाची (hindutva) भूमिका स्वीकारल्यावर ‘राज ठाकरे हे रंगबदलू आहेत,’ अशी टीका ‘एआयएमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी केली होती. त्यावर पलटवार करताना मनसेच्या नेत्यांनी औवेसी यांनी तोंड सांभाळून बोलावं नाहीतर, कानाखालचा रंग कसा बदलतो हे महाराष्ट्रात येऊन समजेल, असा थेट इशाराच दिला आहे. 

हेही वाचा- नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

मनसेच्या (mns) पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे (raj thackeray) यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यापासून विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. ‘एआयएमआयएम’चे (aimim) खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी त्यांच्यावर सर्वात पहिल्यांदा टीका केली होती. केवळ हिंदू मतांवर डोळा ठेवून राज ठाकरे यांनी हिंदुत्वा (hindutva)ची भूमिका स्वीकारली आहे. ठाकरे यांना मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का व्हायला लागला? असा प्रश्न विचारत आम्ही मनसेला घाबरत नाही, कुणीही अंगावर आलं, तर त्याला शिंगावर घेऊ शकतो, या शब्दांत जलील यांनी मनसेला थेट आव्हानच दिलं होतं. 

तर, त्यापाठोपाठ ‘एआयएमआयएम’चे (aimim) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला. राज ठाकरे हे ऋतूंप्रमाणे रंग बदलत आहेत. त्यामुळे ते रंगबदलू हिंदू झाले आहेत. अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर टीका केल्यावर फुकटची प्रसिद्धी मिळते, हे ठाऊक असल्याने ओवैसी बरळत असतात. ओवैसींना महाराष्ट्रात आल्यानंतर कानाखालचा रंग बदलणं हे काय असतं हे कळेल, अशा शब्दांत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (avinash jadhav) यांनी औवेसींना प्रत्युत्तर दिलं. 

हेही वाचा- दोन झेंड्यांची गोष्ट, मनसे-शिवसेनेत खडाजंगी 

तर, मनसे नेते अविनाश अभ्यंकर (avinash abhynkar) यांनी ओवैसींना तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही आताची नाही. तर आधीपासूनच ही भूमिका मांडत असून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ओवैसींनी आपण कुणाविषयी काय बोलतो? हे लक्षात घेऊनच बोलावं. आताचं त्यांचं विधान म्हणजे त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचं लक्षण आहे, असं अभ्यंकर म्हणाले. 

याआधी मनसेचे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करून जलील यांच्यावर निशाणा साधला होता. मनसेच्या नादाला लागू नका, नाहीतर काय अवस्था होते हे अबू आझमी यांना विचारा असं नांदगावकर म्हणाले. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा