Advertisement

दोन झेंड्यांची गोष्ट, मनसे-शिवसेनेत खडाजंगी

शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी भगव्या रंगाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करतानाच अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य केलं.

दोन झेंड्यांची गोष्ट, मनसे-शिवसेनेत खडाजंगी
SHARES

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (shiv sena) सामनातील अग्रलेखातून मनसेवर (Mns) शेलक्या शब्दांत टीका केल्यानंतर मनसेकडूनही तेवढ्याच आक्रमकपणे शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे. याकडे पाहता हिंदुत्व (hindutva) आणि मराठीच्या (marathi) विषयावरून मनसे आणि शिवसेनेत या पुढच्या काळातही अशीच खडाजंगी पाहायला मिळेल, असं दिसतं आहे.

शिवसेनेने सामना (samaana) या मुखपत्रातील अग्रलेखातून (editorial) मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर टीका केली. पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी भगव्या रंगाच्या नव्या झेंड्याचं (saffron flag) अनावरण करतानाच अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावर सामनातील अग्रलेखात सडकून टीका करण्यात आली आहे. 

हेही वाचा- हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

"मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा!" अशा शब्दांत राज ठाकरेंना टोला लगावण्यात आला आहे. 

त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी पलटवार करत शिवसेनेच्या नेतृत्वाला आधुनिक अफझल खानाची उपमा देत, मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खुपसल्याचं सांगत दोषी ठरवलं आहे.

हेही वाचा- शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

"आधुनिक अफजल खानांनी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राज साहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामनाच्या अग्रलेखातून बाहेर पडताहेत. काळजी करू नका आम्हीच उपचार करू", अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांना अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. 

त्याआधी सरकार ‘काॅमन मिनिमम प्रोग्राम’वर चालू आहे का ते माहीत नाही, पण शिवसेना मात्र ‘काॅमन मिनिमम हिंदूत्व’वर गेली आहे हे नक्की, असं म्हणत शिवसेनेला चिमटा काढला होता. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा