Advertisement

शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

महाविकास आघाडीच्या (maha shiv aghadi) शिवभोजन थाळी (Shiv bhojan thali) योजनेला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सुरूवात करण्यात आली. या योजनेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री झाली.

शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री
SHARES

महाविकास आघाडीच्या (maha shiv aghadi) शिवभोजन थाळी (Shiv bhojan thali) योजनेला प्रजासत्ताक दिनाचं (republic day) औचित्य साधून सुरूवात करण्यात आली. या योजनेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री झाली. 

मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी, तर पुण्यात पमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी सध्या राज्यातील १२५ केंद्रांवर दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळीची (Shiv bhojan thali) व्यवस्था करण्यात आली आहे. या थाळीत भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

हेही वाचा- शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डसक्ती?, मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा

प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना (woman welfare group) हे काम देण्यात येत आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणं अपेक्षित आहे. पहिल्या दिवशी ठाणे, नाशिक या भागांमध्ये शिवभोजन थाळीची (Shiv bhojan thali) सर्वाधिक विक्री झाली. 

‘अशा’ आहेत अटी 

  • जेवण दुपारी १२ ते २ याच कालावधीत उपलब्ध असेल.
  • प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला जास्तीत जास्त १५०० जणांनाच जेवण मिळेल
  • जेवणात ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल.
  • शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडं स्वत:ची पुरेशी जागा असावी.
  • भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या दिवशी नाशिकमध्ये १,००० तर ठाणे इथं १,३५० थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी ७०० थाळ्यांची विक्री झाली आहे. 

गोरगरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळावं हाच या याजनेमागील उद्देश आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असं आवाहन उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी केलं.  

तर, पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त दरात आणि दर्जेदार जेवण असलेली थाळी मिळावी हाच या योजनेमागील उद्देश असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. 

हेही वाचा- हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा