Advertisement

नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

शिवसेना नेते आमदार अनिल परब (mla anil parab) यांनीही केवळ नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
SHARES

ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Mns) कार्यालयाबाहेर तसंच सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा उल्लेख ‘हिंदूहृदयसम्राट’ (hinduhrudaysamrat) असा करण्यात आल्याने शिवसेनेतून (shivsena) नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेते आमदार अनिल परब (mla anil parab) यांनीही केवळ नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात राज ठाकरे (raj thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (chatrapati shivaji maharaj) राजमुद्रा (rajmudra) असलेल्या पक्षाच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्याचं (saffron flag) अनावरण केलं. त्यानंतर आपल्या भाषणाची सुरूवात नेहमीप्रमाणे “माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”, अशी न करता शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे “माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” अशी साद घालत केली. 

हेही वाचा- अदनान सामी यांना पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

तसंच भाषणातही मी मराठी (marathi) आहे आणि हिंदू (hindu) देखील, मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केला, तर मराठी म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असं राज ठाकरे (raj thackeray) यांनी ठणकावून सांगितलं. शिवाय मशिदिवरील भोंग्यासहीत पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या मुसलमानांविषयी सडेतोड मते व्यक्त करत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची पुढील वाटचाल हिंदुत्वाच्या (hindutva) मार्गानेच होईल, हे स्पष्ट केलं.

त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (avinash jadhav) यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर ‘साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृहयसम्राट राज ठाकरे’ (raj thackeray) असे बॅनर लावले. हे बॅनर वाचून शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यातून त्यांनी मनसेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा- हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

यावर शिवसेना नेते अनिल परब (mla anil parab) म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांनी हिंदूंसाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं आहे. त्यामुळेच त्यांना सन्मानाने हिंदूहृदयसम्राट असं म्हटलं जातं. उगीग कुणी आपल्या नावापुढं हिंदूहृदयसम्राट असं लावल्याने हिंदूहृदयसम्राट होत नाही आणि हिंदूंची मतं देखील मिळत नाहीत. याआधी मनसेने वेगवेगळ्या धर्मातील लोकांना आकर्षित करण्यासाठी जो विविधरंगी झेंडा वापरला होता, त्याचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत परब यांनी राज यांना टोला लगावला आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा