Advertisement

मला हिंदूहृदयसम्राट बोलू नका, तो मान बाळासाहेबांचा- राज ठाकरे

‘मला हिंदूहृदयसम्राट बोलू नका’, अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सोमवारी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.

मला हिंदूहृदयसम्राट बोलू नका, तो मान बाळासाहेबांचा- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ (Hinduhrudaysamrat) हे विशेषण लावल्यावरून शिवसेना (shiv sena) आणि मनसेत (mns) खडाजंगी सुरू झालेली असतानाच ‘मला हिंदूहृदयसम्राट बोलू नका’, अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सोमवारी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.

केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व (caa) कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मनसेच्या (mns) माध्यमातून येत्या ९ फेब्रुवारी रोजी भव्यदिव्य मोर्चा (caa support rally) काढण्यात येणार आहे. या मोर्चाची रणनिती ठरवण्यासाठी सोमवारी वांद्र्यातील रंगशारदा (rangsharda) सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar), नितीन सरदेसाई (nitin sardesai) आणि अनिल शिदोरे (anil shidore) इ. नेतेही उपस्थित होते. 

हेही वाचा- शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

या बैठकीत बोलताना राज ठाकरे (raj thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोर्चाविषयी मार्गदर्शन केलं. सोबतच आपल्याला हिंदूहृदयसम्राट ((Hinduhrudaysamrat)) ही उपाधी लावू नये, तो मान केवळ बाळासाहेबांचा आहे. शिवाय राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अनादर करू नये, अशा महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीला राज ठाकरे यांनी केवळ १० मिनिटेच उपस्थिती लावली. त्यानंतर तब्येत बरी नसल्याने ते उपचार घेण्यासाठी रवाना झाले. 

राज ठाकरे (raj thackeray) यांनी गेल्या आठवड्यात गोरेगाव इथं झालेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात हिंदूत्वाची भूमिका अत्यंत जोरदारपणे मांडली होती. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्या अशी मागणी करताना केंद्र सरकारच्या सीएए (caa) आणि एनआरसी (nrc) कायद्याला त्यांनी समर्थन दिलं. सोबतच सीएए आणि एनआरसी विरोधातील मोर्चांना मोर्चांनीच उत्तर देण्यासाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा- नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

या महाअधिवेशनानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (avinash jadhav) यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर ‘साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृहयसम्राट राज ठाकरे’ (raj thackeray) असे बॅनर लावले. त्यावरून शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी कुणी नाव लावल्याने हिंदूहृदयसम्राट होत नाही, असं म्हणत टीका केली होती. शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमधूनही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात होत होत्या. सोशल मीडियावरही अनेकजण यावर मत व्यक्त करत होते.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा