Advertisement

मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा? राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

​मनसे अध्यक्ष राज ठाकरे​​​ (raj thackeray) आणि भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांच्यात बैठक झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मनसेच्या मोर्चाला (mns rally) अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळणार असल्याची शक्यताही आहे.

मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा? राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं
SHARES

देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी (bangladeshi and pakistani) घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत भव्यदिव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांच्यात बैठक झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मनसेच्या मोर्चाला (mns rally) अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा- 'या' मार्गावरून निघणार मनसेचा मोर्चा, परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज

भाजप नेते अॅड आशिष शेलार यांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजता राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. परंतु या चर्चेचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकलेला नाही. मनसे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत काढत असलेल्या मोर्चामुळे सुधारीत नागरिकत्व कायद्याला (CAA) एकप्रकारे समर्थनच मिळणार आहे. त्यामुळे भाजपचा या मोर्चाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये काही खलबतं झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात हिंदुत्ववादी विचारांवर भाष्य करत राज ठाकरे यांनी पक्षाची दिशा स्पष्ट केली होती. याच कार्यक्रमात राज ठाकरे (raj thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेल्या पक्षाच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्याचंही अनावरण केलं होतं. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भारतात राहणाऱ्या घुसखोरांसोबतच मुस्लिमांच्या कट्टरतावादालाही आव्हान दिलं होतं.

मी मराठीबरोबरच हिंदू देखील आहे. मराठीला (marathi) कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडणार नाही आणि माझ्या धर्माला (hindu) कुणी धक्का लावला, तरी त्याच्या अंगावर जाईन. या देशात राहणारा प्रत्येक मुसलमान हा भारतीयच असल्याचं माझं ठाम मत आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म हा घरातच ठेवला पाहिजे. त्यामुळे आमच्या आरतीमुळं कुणाला त्रास होणार नसेल, तर मशिदीने लावलेल्या भोंग्यामुळे नमाजाचा (namaz) त्रास का व्हावा, असा सवाल त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला होता.   

हेही वाचा- ‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे

देशाबाहेरून आलेल्या घुसखोरांना पोसण्यासाठी भारत काय धर्मशाळा लागून गेलेली नाही. त्यामुळे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सीएए (caa) आणि एनआरसी (nrc)विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत. त्यातील घुसखोरांची संख्या हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं पाहिले. त्यासाठी मनसे ९ फेब्रुवारी काढणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे  (raj thackeray) यांनी केलं होतं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा