आत्महत्या करण्याच्या ट्विटवर पोलिसांची समयसूचकता, तरूणाचे वाचवले प्राण

मुंबई पोलिसांच्या (mumbai police) तत्परतेमुळे आत्महत्या (sucide) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरूणाचा जीव वाचला आहे. या तरूणाने ट्विट (twitter) करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं.

आत्महत्या करण्याच्या ट्विटवर पोलिसांची समयसूचकता, तरूणाचे वाचवले प्राण
SHARES
मुंबई पोलिसांच्या (mumbai police)  तत्परतेमुळे आत्महत्या (sucide) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरूणाचा जीव वाचला आहे. या तरूणाने ट्विट (twitter) करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. हे ट्विट बघताक्षणीच पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली. पोलिसांनी या तरूणाचा मोबाइल (mobile) नंबर आणि पत्ता शोधून काढत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांची समयसूचकता, तत्परता आणि समन्वयामुळे एका तरुणाचा जीव वाचला. 

मुंबई पोलिसांच्या (mumbai police) ट्विटर हँडल (Twitter handle) वर रविवारी दुपारी 'मी आत्महत्या (sucide) करणार असून, या गुन्ह्याची शिक्षा काय असेल', असं ट्विट निलेश बेडेकर (३९) याने Nilesh Bedekar@bedekarnilesh या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं. मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्यांपैकी पोलिस कॉन्स्टेबल समीर साळवे यांनी हे ट्विट बघितले. ट्टिवट बघताक्षणीच विलंब न लावता कॉन्स्टेबल समीर साळवे यांनी निलेश बेडेकरचं ट्विटर अकाऊंट ((twitter account) तपासला. साळवे यांनी बेडेकर याच्या टाइमलाइनवरून त्याचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता शोधून काढला. त्यानंतर त्याला पोलिसांनी फोन केला. फोनवर पोलिसांनी त्याची समजूत काढली. 

साळवे हे मोबाइल (mobile) वर बेडेकरची समजूत काढत असताना दुसरीकडं पोलिस (police) नियंत्रण कक्षातून वनराई पोलिसांना कळविण्यात येऊन निलेश बेडेकरचा पत्ता त्यांना दिला. वनराई पोलिस ठाण्यातील निरीक्षक महेश निवेतकर यांचे पथक तत्काळ बेडेकर यांच्या घरी पोहोचले. बेडेकर यांनी समस्या पोलिसांनी जाणून घेतली. पोलिसांनी बेडेकर त्यांना समजावून आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलिस ठाण्यात आणलं. पोलिसांनी समजावल्याने बेडेकर यांने आत्महत्या (sucide) करण्याचा विचार सोडून दिला. हेही वाचा -

मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी लाॅबींग सुरू

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा